शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Marathon : अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या मुली चमकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 04:03 IST

अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या महिलांनी चमक दाखविताना रौप्य व कांस्य पदक मिळविले.

मुंबई : अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या महिलांनी चमक दाखविताना रौप्य व कांस्य पदक मिळविले. भारतीय रेल्वेच्या पारुल चौधरीने ११ वर्षे जुना स्पर्धा विक्रम नोंदवत दिमाखात सुवर्ण पटकावले. मुंबई कस्टमच्या आरती पाटील आणि नाशिकच्या मोनिका आथरे यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.पारुलने पहिल्या ११ किमी अंतरापासूनच आघाडी घेत, यंदाच्या अर्धमॅरेथॉनमध्ये एकहाती दबदबा राखताना तिने १:१५:३७ अशी विक्रमी वेळ देत महाराष्ट्राच्या कविता राऊतचा स्पर्धा विक्रम मोडला. कविताने २००८ साली येथे सुवर्ण पदक जिंकताना १:१६:३७ अशी वेळ नोंदविली होती. आता या स्पर्धेतील विक्रम पारुलच्या नावावर झाला आहे. त्याच वेळी मूळच्या कोल्हापूरच्या, परंतु सरावासाठी नाशिक गाठलेल्या आरती पाटील या शेतकरी कन्येने आपल्या पहिल्याच प्रयत्नात मुंबईत रौप्य जिंकले. तिने १:१८:०३ अशी वेळ दिली. नाशिकची अनुभवी आंतरराष्ट्रीय धावपटू असलेल्या मोनिका आथरेकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती, परंतु दुखापतीतून सावरल्यानंतर आपल्या पहिल्याच मॅरेथॉनमध्ये सहभागी होत मोनिकाने १:१८:३३ अशी वेळ देत कांस्य कमाई केली.पुरुषांमध्ये सेनादलाच्या तीर्था पून याने १:०५:३९ अशी वेळ देत सुवर्ण पदकावर नाव कोरले. २०११ साली बी. सी. टिळक याने नोंदविलेला (१:०४:४५) विक्रम स्पर्धा विक्रम मोडण्यात त्याला थोडक्यात अपयश आले. १५ किमीपासून आघाडी घेत, तीर्थाने उत्तराखंडच्या मान सिंग (१:०६:०६) आणि बलियप्पा एबी (१:०७:११) यांना सहज मागे टाकून बाजी मारली. मान सिंग आणि बलियप्पा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पटकावले.

टॅग्स :Mumbai Marathonमुंबई मॅरेथॉनIndiaभारत