शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

एखादा तरी ‘बोल्ट’ तयार व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 06:07 IST

क्रीडाप्रेमी असोत की कट्टर पाठीराखे, २०१८ सालात आपणाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले तर तो बोनस ठरावा. एखाददुसरा उसेन बोल्ट दशकभरामध्ये हाती लागला तर ते फार मोठे यश असेल!

- रणजीत दळवीसव्वाशे कोटींची लोकसंख्या असणाºया भारतापाशी १०० उसेन बोल्ट निर्माण करण्याची क्षमता आहे! हे विधान आहे अ‍ॅथेन्स (२००४) आॅलिम्पिकमध्ये ट्रॅप शूटिंगचे रौप्यपदक जिंकणाºया कर्नल राजवर्धन सिंग राठोड यांचे. राजकारणात प्रवेश करणाºया राठोड यांच्यासारख्या खेळाडूला प्रथमच देशाचे क्रीडामंत्रीपद देण्यात आले ही गोष्ट दूरदर्शीपणाची म्हणावी लागेल. क्रीडाप्रेमींना थोडा दिलासा किंवा त्यांची अपेक्षापूर्ती करण्याचे आश्वासन देताना शंभर उसेन बोल्ट निर्माण करण्याची क्षमता भारताकडे आहे, असे म्हणणे कितपत योग्य? ज्या देशाला आजवरच्या आॅलिम्पिक इतिहासामध्ये उसेन बोल्टएवढी पदके सर्व खेळांमध्ये मिळवता आली नसतील तर राठोड यांनी असे विधान करणे चुकीचे नाही का?२०१७ या वर्षातील आपली क्रीडा क्षेत्रातील कामगिरी समाधानकारक नाही. ही पार्श्वभूमी पाहता २०१८ मध्ये भारत कोठे असेल? आशियाई व राष्टÑकुल स्पर्धांचे हे वर्ष. गेल्या दोन आशियाई खेळांमध्ये आपण २५ सुवर्णपदकांसह ११९ पदके मिळवली. साधारणपणे राष्टÑकुल खेळांमध्येही आपली तशीच स्थिती होती. अ‍ॅथलेटिक्स, कबड्डी, हॉकी, नेमबाजी, वेटलिफ्टिंग, कुस्ती, तिरंदाजी आणि टेनिस हे खेळ आपली शक्तिस्थाने जरी असली तरी चीन, जपान, दोन्ही कोरिया, आॅस्ट्रेलिया, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कॅनडा यासारख्या बलशाली देशांसमोर आपण थिटे पडतो. अशा स्थितीत राठोड यांनी काही नवे उपाय योजले आहेत. २०२०, २०२४ आणि २०२८ या आॅलिम्पिकसाठी सोयी-सुविधा व साधने निर्माण करण्याची इच्छाशक्ती सरकारने दाखविली आहे.(लेखक ज्येष्ठ क्रीडा समीक्षक आहेत.)

टॅग्स :Sportsक्रीडा