शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय खुल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अविनाश साबळेला विक्रमासह सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 03:27 IST

मूळ पुण्याचा रहिवासी असलेल्या पण सेनादलाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या अविनाश साबळे याने राष्ट्रीय खुल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली.

पुणे : मूळ पुण्याचा रहिवासी असलेल्या पण सेनादलाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या अविनाश साबळे याने राष्ट्रीय खुल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याने पुरूषांंच्या ३००० मीटर स्टिपलचेसमध्ये हा पराक्रम करताना नवी राष्ट्रीय विक्रम प्रस्थपित केला. महाराष्ट्राच्या अर्चना आढाव आणि रोझलीन डिसुझा या महाराष्ट्राच्या खेळाडूंना अनुक्रमे रौप्य तसेच कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. पुरूषांच्या ३००० मीटर स्टिचलचेसमध्ये अविनाशने ३७ वर्षांपूर्वीचा विक्रम इतिहासजमा करताना ८ मिनिटे २९.८० सेकंदांची प्रभावी वेळ नोंदविली. यापूर्वी हा विक्रम गोपाल सैनीच्या नावावर होता. त्याने १९८१ मध्ये टोकियोत झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ८ मिनिटे ३०.८८ अशी वेळ नोंदविली होती. २४ वर्षीय अविनाशने हा विक्रम आज मागे टाकला. सेनादलाचाच राकेशकुमार स्वामी दुसरा आला. त्याने ८ मिनिटे ४७.३१ सेकंद अशी वेळ दिली. दुर्गा बहादूर (८ मिनिटे ४८.२९ सेकंद) तिसऱ्या स्थानी राहिला.२४.६८ सेकंद वेळेसह रोझलीन हिने महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक प्राप्त केले. या प्रकारात कर्नाटकची रीना जॉर्ज (२४.१० सेकंद) सुवर्णपदकाची मानकरी ठरली. रेल्वेच्या छावी एस. हिने २४.२३ सेकंद वेळ देत रौप्यपदक आपल्या नावे केले.महिलांच्या ३००० मीटर स्टिपलचेस प्रकारात महाराष्ट्राची कोमल जगदाळेला (१० मिनिटे ३३.५६ सेकंद) पदक जिंकण्यात अपयश आले. ती चौथी आली. रेल्वेच्या चिंता यादवने १० मिनिटे व १०.१९ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले.अर्चनाचे सुवर्ण .०३ सेकंदाने हुकलेमहिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अर्चनाचे सुवर्ण अवघ्या .०३ सेकंदांनी हुकले. अतिशय अटीतटीच्या ठररलेल्या या शर्यतीत ओएनजीसीच्या टिष्ट्वंकल चौधरीने २ मिनिटे ७.४३ सेकंद वेळेसह बाजी मारली. पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू असलेल्या अर्चनाने २ मिनिटे ७,४६ सेकंद अशी वेळ दिली. तमिळनाडूच्या गोमतीने २ मिनिटे ८.५९ सेकंद वेळ देत कांस्यपदक मिळविले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या