अॅथलेटिक्समध्ये भारत ‘जैसे थे’च!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:44 IST2017-12-26T00:44:41+5:302017-12-26T00:44:46+5:30
आंतरराष्ट्रीय स्तरावर उसेन बोल्टने अॅथलेटिक्सला खूप पुढे नेले. पण भारतासाठी जणू वेळ थांबला होता. या खेळात भारताची झोळी खालीच राहिली.

अॅथलेटिक्समध्ये भारत ‘जैसे थे’च!
आंतरराष्ट्रीय स्तरावर उसेन बोल्टने अॅथलेटिक्सला खूप पुढे नेले. पण भारतासाठी जणू वेळ थांबला होता. या खेळात भारताची झोळी खालीच राहिली. खेळाच्या इतिहासात महान धावपटू ‘शोमॅन’ बोल्ट याने लंडन विश्वचॅम्पियनशीपमध्ये फिनिशिंग लाईनचे चुंबन घेत खेळातून निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीने एका युगाचा अंत झाला. ३१ वर्षीय बोल्टने डोप कलंकित या खेळात विश्वासर्हता आणली. त्याची संपूर्ण कारकीर्द डागविरहित राहिली. बोल्टच्या सुवर्णमय करिअरचा शेवट मात्र निराशाजनक ठरला.
४ बाय १०० मीटर रिले शर्यती दरम्यान त्याच्या मांसपेशी ताणल्या गेल्या आणि तो स्पर्धेतून बाहेर पडला. आपला अशा प्रकाचा शेवट होईल, याचा विचार बोल्टनेही केला नसावा. त्याला महान बॉक्सर मोहम्मद अलीच्या श्रेणीत ठेवणे वादाचा विषय ठरेल. मात्र, बिजिंग आॅलिम्पिक २००८ नंतर जमैकाच्या या धुरंधराने वेग आणि चमत्काराने खेळ जगताला जिंकून घेतले.
>शॉटपूटमध्ये मनप्रित कौर दोन वेळा पॉझिटिव्ह आढळली. त्यामुळे भुवनेश्वर येथे तिने मिळवलेल्या आश्यिाई चॅम्पियनशीप शानदार प्रदर्शनाची चमक कमी झाली.
>दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून भारताची अॅथलेटिक्स ही ताकद राहिली आहे. भुवनेश्वर येथील आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत चीनला मागे टाकत भारताने अव्वल स्थान गाठले हेच या वर्षीचे भारताचे सर्वात मोठे यश म्हणता येईल.
भारताचा विचार केला तर अॅथलेटिक्समध्ये विशेष यश मिळवले नाही.
अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये पॅरिस विश्व चॅम्पियनशीमधील लांब उडीत मिळ्वलेले कांस्यपदक सोडले तर भारताच्या झोळीत पदक पडले नाही.
लंडन येथे भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याच्याकडून पदकाची आशा होती. मात्र, ज्युनियर गटात विश्वविक्रम नोंदवणारा नीरज अंतिम फेरीतही पोहचू शकला नाही.
देविंदर सिंग हा डार्कहार्स निघाला. त्याने अंतिम फेरी गाठली होती, मात्र गांजा सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्याचे संघात निवड होणे संशयास्पद होते. भारताचा गोविंद लक्ष्मणनने ५ हजार मीटर शर्यतीत आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले.