शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018 : खेळता येत नाही म्हणून कंपनीने काढलं, पण 'त्यानं' जिद्दीनं सुवर्णपदकच जिंकून दाखवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 12:49 IST

Asian Games 2018 : तुझ्यातील खेळाडू संपला, तुला आता स्पर्धा जिंकणे शक्य होणार नाही अशी सबब देत सार्वजनिक क्षेत्रातील एका बड्या कंपनीने एका खेळाडूला घरचा रस्ता दाखवला होता. मात्र...

नवी दिल्ली - तुझ्यातील खेळाडू संपला, तुला आता स्पर्धा जिंकणे शक्य होणार नाही अशी सबब देत सार्वजनिक क्षेत्रातील एका बड्या कंपनीने एका खेळाडूला घरचा रस्ता दाखवला होता. मात्र या खेळाडूने नोकरी गेल्याने आलेल्या नैराश्यावर मात करत जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत देशासाठी सोनेरी पदकाची कमाई केली. हा खेळाडू म्हणजे आशियाई क्रीडास्पर्धेतील पुरुषांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा मनजित सिंग होत.2014 साली मनजितला सार्वजनिक क्षेत्रातील एका बड्या कंपनीने खेळायला जमणार नाही असे सांगत कामावरून काढून टाकले होते. काही काळ निराशेत घालवल्यानंतर मनजितने स्वत:ला सिद्ध करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्याने कठोर मेहनत घेतली. घरदार विसरून सराव केला. अखेरीस 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सोनेरी यश त्याच्या पदरात पडले.  मनजित या यशाबद्दल म्हणतो,  जेव्हा माझी नोकरी गेली त्यावेळी काही काळ मी निराश झालो होतो. पण मी संपलेलो नाही हे मला सिद्ध करायचं होतं. मी स्वत:ला सुवर्णपदकाचा दावेदार मानत नव्हतो. गेली दोन वर्षे मी खूप तयारी केली होती. त्याचेच फळ शेवटी मला मिळाले. ज्यांनी मला कामावरून कमी केले. त्यांना मी काहीही उत्तर देऊ इच्छित नाही. त्यांच्या ठिकाणी ते योग्य होते."  सुवर्णपदक जिंकल्यानंतर मनजितला नोकरीबाबत कोणतीही चिंता वाटत नाही. कारण हरियाणा सरकार आता आपल्याला चांगली नोकरी देईल असे त्याला वाटते. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मनजित जेव्हा सराव करत होता तेव्हा त्याला पुत्ररत्नाचा लाभ झाला होता. मात्र सरावामुळे त्याला स्वत:चा मुलाचा चेहराही पाहता आला नाही. तेव्हा एवढाच जर त्याग करत असाल तर मुलासाठी सुवर्णपदकच घेऊन या, अशी इच्छा त्याच्या पत्नीने व्यक्त केली. अखेर मनजितने सुवर्णपदक जिंकून आपल्या पत्नीची इच्छाही पूर्ण केली.  

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाManjeet Singhमनजित सिंग