आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 07:05 IST2026-05-06T07:04:55+5:302026-05-06T07:05:19+5:30

Rashi Bhavishya In Marathi: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींना लाभ होईल आणि कोणाला सावधान राहावे लागेल? जाणून घ्या सर्व १२ राशींचे भविष्य!

Today Horoscope 6 May 2026: Favorable day for financial investments, possibility of financial gains | आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता

आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता

मेष- आज चंद्र रास बदलून 06 मे, 2026 बुधवारी धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपणास आपला संताप नियंत्रित ठेवावा लागेल. कोणत्याही कामात व्यत्यय येण्यास हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव भासेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही. एखाद्या मंगल प्रसंगात सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. आणखी वाचा

वृषभ- आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज कार्यपूर्तीस होणारा विलंब व शारीरिक अस्वास्थ्य ह्यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा व्याप वाढल्याने मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. आज नवे काम आज सुरू करू नये. आपल्या खाण्या - पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा

मिथुन- आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र व कुटुंबीयांसह प्रवास किंवा मेजवानीचा बेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. भारी वस्त्रे, स्वादिष्ट भोजन व वाहन सुख मिळेल. आणखी वाचा

कर्क- आजचा दिवस यशदायी व आनंददायी आहे. कुटुंबियांसह घरात सुखा - समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल. स्त्रीयांच्या सहवासात आनंदित व्हाल. आपल्या आधीन असणार्‍या व्यक्ती व सहकारी ह्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा

सिंह-  आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपणास लेखन व साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयातील यश व प्रिय व्यक्तीशी झालेला सुसंवाद आपले मन आनंदित करेल. स्त्री वर्गाकडून अधिक सहकार्य मिळेल. शरीर प्रकृती उत्तम राहील. आणखी वाचा

कन्या-  आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. आरोग्य यथा तथाच राहील. मनाला चिंता लागून राहील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची प्रकृती बिघडेल. स्वकियांशीच खटके उडून मतभेद निर्माण होतील. स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. घर, वाहनाच्या खरेदी - विक्रीसाठी आजचा दिवस चांगला नाही. आणखी वाचा

तूळ- आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज एखाद्या मांगलिक कार्या निमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळे घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल. कामा निमित्त बाहेर जावे लागेल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. नवीन कार्य सुरू करू शकाल. धनलाभ संभवतो. आजचा दिवस आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे. आणखी वाचा 

वृश्चिक- आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज घरात सुख शांती नांदेल. नातलग व मित्रांचे आगमन होईल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मांगलिक कार्यावर खर्च होईल. अलंकार व सुगंधी पदार्थांची खरेदी कराल. आपल्या वाणीचा प्रभाव इतरांना मोहीत करेल. धनलाभ होईल. कौटुंबिक प्रश्न सहजगत्या सोडवाल. आणखी वाचा

धनु-   आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस प्रवासाचा आहे. ठरविलेली कामे पूर्ण होतील. शरीर व मन स्वस्थ राहिल्यामुळे आपण उत्साही व आनंदी राहाल. कुटुंबात मंगल कार्ये ठरतील. स्वकीयांशी संवाद साधल्याने मन प्रसन्न राहील. आणखी वाचा

मकर- आज एखाद्या गूढ विषयाची गोडी लागेल. आपण त्याच्यातच मग्न व्हाल. तसेच त्यासाठी खर्च देखील कराल. कोर्ट - कचेरी संबंधी कामे निघतील. व्यावसायिक कामात विघ्न येईल. मित्रांच्या प्रतिष्ठेची हानी होईल. उत्साह व प्रसन्नता नाहीशी होईल. एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

कुंभ-   आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात लाभ होईल. मित्र भेटतील व त्यामुळे आपणास आनंद होईल. त्यांच्यासह प्रवास सुद्धा करण्याचे ठरवाल. नवीन कामाची सुरूवात फायदेशीर ठरेल. आणखी वाचा

मीन- आजचा दिवस व्यापार - व्यवसायात लाभ मिळवून देणारा आहे. नोकरीत आपल्या यशामुळे वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. व्यापार्‍यांना व्यापारात लाभ व वृद्धी होईल. पित्याकडून लाभ होतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.  आणखी वाचा

Open in app

Web Title : आज का राशिफल 6 मई 2026: निवेश के लिए अनुकूल दिन, धन लाभ की संभावना

Web Summary : राशिफल के अनुसार, मिथुन राशि के जातक यात्रा और उत्सव का आनंद लेंगे, जबकि कर्क राशि वाले घर में खुश रहेंगे। तुला राशि को निवेश से लाभ होगा। कन्या राशि को चुनौतियों का सामना करना पड़ेगा, और वृश्चिक राशि पारिवारिक सुख का अनुभव करेगी। कुल मिलाकर, भाग्य का मिला-जुला रूप रहेगा।

Web Title : Horoscope for May 6, 2026: Good day for investment, profits likely.

Web Summary : Horoscope predictions vary across zodiac signs. Gemini enjoys travel and feasts, while Cancer finds joy at home. Libra benefits from investments. However, Virgo faces challenges, and Scorpio experiences domestic bliss. Overall, a mixed bag of fortunes.