Lokmat Astrology

दिनांक : 18-Sep-25

राशी भविष्य

 मकर

मकर

हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवून खुश होतील. प्रेमिकेची काळजी घेतील. विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदारास महत्व देतील. त्यामुळे त्यांचे नाते दृढ होऊ शकेल. ह्या आठवड्यात आपण जर पैश्यांचा सदुपयोग केलात तर ते आपल्यासाठी हितावह होईल. आपण स्वतःसाठी काही नवीन कपडे, मोबाईल, दागिने इत्यादींची खरेदी करू शकता. ह्या व्यतिरिक्त कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्यावर सुद्धा लक्ष द्याल. असे असले तरी काही पैसा आपणास गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा ठेवावा लागेल. ह्या आठवड्यात व्यवसायात आपणास चांगला लाभ होईल. परंतु इतरांवर विश्वास ठेवल्यास नुकसान होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना ह्या आठवड्यात आपल्या कामावर लक्ष द्यावे लागेल. वरिष्ठ आपल्या जवाबदारीत वाढ करू शकतात. विद्यार्थी मेहनत करण्यात मागे राहणार नाहीत. एखाद्या स्पर्धेत जर ते सहभागी झाले तर त्यात सुद्धा ते यशस्वी होऊ शकतील. ते मित्रांपासून काही काळासाठी दूर राहतील. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक टेन्शन घेण्याची गरज नाही. जर काही लहान - सहान समस्या असल्या तर त्या योगासन, प्राणायाम किंवा व्यायाम करून सहजपणे दूर करू शकाल.

राशी भविष्य

18-09-2025 गुरुवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA कृष्ण द्वादशी

नक्षत्र : पुष्य

अमृत काळ : 09:27 to 10:58

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:24 to 11:12 & 15:12 to 16:0

राहूकाळ : 14:01 to 15:33