ह्या आठवड्यात आपणास नेत्र विकार होण्याची संभावना आहे. त्याकडे दुर्लक्ष न करता एखाद्या चांगल्या डॉक्टरां कडून उपचार करून घ्यावेत. ऋतू बदलामुळे सर्दी, खोकला इत्यादींचा त्रास सुद्धा होऊ शकतो. ह्या आठवड्यात प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकतील. आपल्या घरी विशेष काही करण्याचा प्रयत्न ह्या आठवड्यात आपण करू शकाल. असे केल्याने आपला वैवाहिक जोडीदार आपल्यावर खुश होईल. व्यापाऱ्यांना जर त्यांच्या व्यवसायात काही बदल करावयाचा असेल तर त्यांनी तो ह्या आठवड्यात करू नये. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपल्या कामगिरीच्या प्रशंसेसह पगारवाढ होण्याची संभावना सुद्धा आहे. आपल्या आर्थिक स्थितीत काही बदल होत असल्याचे आपणास जाणवेल. विद्यार्थ्यांनी मन लावून अध्ययन केल्यास त्यांना चांगले यश मिळू शकते.