आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 07:39 IST2026-04-21T07:38:49+5:302026-04-21T07:39:41+5:30

Today Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Daily Marathi Horoscope Today aajche rashi bhavishya 21 april 2026 | आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग

आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग

मेष : आहे. दिवसाची सुरवात द्विधा मनःस्थितीने होईल. इतरांशी वाद होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या गोड बोलण्याने इतरांची मने जिंकू शकाल. आज आपली मनःस्थिती दोलायमान असल्याने शक्यतो नवीन कार्याची सुरवात करू नये.
आणखी वाचा

वृषभ : आहे. आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरवातीस शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कलेस वाव मिळेल.
आणखी वाचा

मिथुन : आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतील. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. आत्मविश्वास वाढेल. मनोरंजनावर खर्च कराल.
आणखी वाचा

कर्क : आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायी आहे. एखाद्या सहलीचा बेत आखू शकाल. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल. एखादा अपघात संभवतो.
आणखी वाचा

सिंह : हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. नवीन ओळखींचा भविष्यात व्यापारासाठी लाभ होण्याची शक्यता आहे. प्राप्तीत वाढ होईल. छोटा पण आनंददायी प्रवास होईल. 
आणखी वाचा

कन्या : आज आपणास आपल्या व्यवसायात धनलाभ होईल. दुपार नंतर नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दिवसभर मनात सुखा- समाधानाची भावना राहील. नोकरीत मिळालेल्या बढतीमुळे लाभ होईल.
आणखी वाचा

तूळ : आळस व कामाचा व्याप ह्यामुळे मन व्याकुळ होईल. नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. नवीन कार्यारंभाच्या दृष्टीने पण आजचा दिवस उत्साह वर्धक आहे. परदेशगमनाचे योग आहेत. व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे. 
आणखी वाचा

वृश्चिक :आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनात सुख व समाधान प्राप्त होईल. एखादा प्रवास संभवतो. दुपार नंतर आरोग्य विषयक तक्रारी उदभवतील. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील.
आणखी वाचा

धनु : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आर्थिक नियोजन करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगता येईल. व्यवसाय वृद्धी होईल.
आणखी वाचा

मकर : आपल्या वक्तृत्व शैलीने इतरांना प्रभावित कराल. गोड बोलून नवीन संबंध प्रस्थापित करू शकाल. आर्थिक नियोजनात यशस्वी व्हाल. नोकरीत सर्वांचे सहकार्य मिळवू शकाल. 
आणखी वाचा

कुंभ : विद्यार्थी, कलाकार व खेळाडू ह्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. पिता व शासनाकडून काही लाभ होऊ शकेल. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील, सबब शक्यतो बाहेरचे खाणे-पिणे टाळा. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.
आणखी वाचा

मीन : आजचा दिवस काल्पनिक विश्वात घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा बेत ठरवू शकाल. दैनंदिन कामे आत्मविश्वास व एकाग्रचित्ताने पूर्ण करू शकाल. 
आणखी वाचा

Open in app

Web Title : आज का राशिफल: 21 अप्रैल 2026: कार्य पूर्ण, इन राशियों को धन लाभ

Web Summary : मेष राशि वालों को दुविधा रहेगी। मिथुन राशि के कार्य अधूरे रहेंगे। सिंह राशि के काम पूरे होंगे, उपहार मिलेंगे। कन्या राशि को व्यवसाय में धन लाभ होगा। धनु राशि को आर्थिक सफलता मिलेगी। छात्रों को लाभ होगा। मीन राशि रचनात्मक रहेगी। विस्तृत भविष्यफल के लिए अपनी राशि देखें।

Web Title : Horoscope Today: April 21, 2026: Tasks Complete, Wealth Gains for These Signs

Web Summary : Aries faces indecision. Gemini sees incomplete tasks. Leo completes work, receives gifts. Virgo gains wealth in business. Sagittarius finds financial success. Students benefit. Pisces enjoys creative flow. Check your sign for detailed predictions.