झेडपी स्थायी समिती सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:54+5:302021-02-05T05:25:54+5:30

.................................... टेनिस बॉल क्रिकेटचे सामने अमरावती : शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित श्री शिवाजी शिक्षण ...

ZP Standing Committee Meeting | झेडपी स्थायी समिती सभा

झेडपी स्थायी समिती सभा

....................................

टेनिस बॉल क्रिकेटचे सामने

अमरावती : शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित श्री शिवाजी शिक्षण संस्था कर्मचारी व मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.दादासाहेब काळमेघ व प्रशांत चांदूरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २७ ते ३१ जानेवारीपर्यंत रुरल इन्स्टिटयूट क्रीडांगणावर टेनिस बॉल क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले. सामन्याचा प्रारंभ प्राचार्य नंदकिशोर चिखले, शैलेश ठाकूर, भालचंद्र घोंगडे, विलास ठाकरे, अभय ढाेंबळे आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.

........................................

तुर काढणीच्या कामाला वेग

अंजनगाव सुजी : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या तुर काढणीच्या कामाला वेग आला आहे.यावर्षी अनेक गावात तुर पिकाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती.आता तुर कापणीसोबतच काढणीच्या कामाला वेग आल्याचे चित्र तालुक्यात आहे.

.......................................

निमखेड बाजार ते हिरापृर रस्ता उखडला

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील निमखेड बाजार ते हिरापूर गावाला जोडणारा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. काही महिन्यांपासून यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.

...............................

शेतीला अखंडित वीजपुरवठा करा

अमरावती : ग्रामीण भागात आजही महावितरण कंपनीकडून भारनियमन सुरू आहे. संत्रा झाडांनाही ओलित करणे आवश्यक आहे. मात्र भारनिमनामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे कृषी पंपाना अखंडीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

Web Title: ZP Standing Committee Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.