झेडपी सदस्यांची १० महिन्यांनंतर सभागृहात एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:12 IST2021-01-22T04:12:43+5:302021-01-22T04:12:43+5:30
अमरावती : कोरोना आचारसंहितेच्या काळात जिल्हा परिषद विषय समिती, स्थायी समिती, जलव्यवस्थापन व आमसभासुध्दा ऑफलाईनऐवजी ऑनलाईन घेण्यात आल्यात. मात्र, ...

झेडपी सदस्यांची १० महिन्यांनंतर सभागृहात एन्ट्री
अमरावती : कोरोना आचारसंहितेच्या काळात जिल्हा परिषद विषय समिती, स्थायी समिती, जलव्यवस्थापन व आमसभासुध्दा ऑफलाईनऐवजी ऑनलाईन घेण्यात आल्यात. मात्र, आता या सभा ऑफलाईन घेण्यास ग्रामविकास विभागाने परवानगी दिल्यानंतर १० महिन्यांनंतर बुधवारी पार पडलेली पहिल्याच विशेष सभेच्या निमित्ताने झेडपीच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात एन्ट्री केली. यासभेला सदस्यांची उपस्थितीही लक्षणीय होती. विशेष म्हणजे तब्बल १० महिन्यांच्या अवकाशानंतर प्रशासन व सदस्य एकमेकासमोर आले होते.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सभा, मेळाव्यांना मनाई केली होती. यामुळे जिल्हा परिषदेच्या दर महिन्यातून एकदा होणाऱ्या विषय समितीच्या सभा तसेच स्थायी व जलव्यवस्थापन समिती आणि आमसभा ऑनलाईन घेण्यात आल्यात. या सभेमुळे अनेक समिती सदस्यांना आपल्या सर्कलमधील विकासकामांचे मुद्दे मांडताना नेटवर्कच्या अडचणी येत असे. त्यामुळे कामात खोळंबा व्हायचा. परंतु आता प्रत्यक्ष झेडपीच्या सभा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अटी व शर्तीचे पालन करून घेतल्या जात असल्याने सदस्यांना संबंधित अधिकाऱ्यासमारे आपले प्रश्न मांडून मांडण्याची संधी २० जानेवारी रोजीच्या विशेष सभेमुळे उपलब्ध झाल्याचे समाधान जिल्हा परिषद सदस्यांनी व्यक्त केले.