जि.प. पार्किंगची जागा ‘फिक्स’

By Admin | Updated: July 22, 2015 00:56 IST2015-07-22T00:56:04+5:302015-07-22T00:56:04+5:30

स्थानिक जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षा व अव्यवस्थित पार्किंगला शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

Zip Parking space 'Fix' | जि.प. पार्किंगची जागा ‘फिक्स’

जि.प. पार्किंगची जागा ‘फिक्स’

दखल : अभियंत्यांनी केली पाहणी
अमरावती : स्थानिक जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षा व अव्यवस्थित पार्किंगला शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत 'लोकमत'ने मंगळवारी वृत्त प्रकाशित करताच याची दखल घेत सीईओ सुनील पाटील यांनी पार्किंग व सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी.जी. भागवत यांनी केली होती. याची दखल घेत भागवत यांनी जिल्हा परिषद आवारातील खुल्या जागेतील पार्किंगसाठी पाहणी अधिकाऱ्यांसमवेत केली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत अस्तव्यस्त लावली जाणारी वाहने शिस्तीत लागणार आहेत.
मिनीमंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत चोरट्यांचा राबता वाढला आहे. भंगार साहित्यासह उभ्या वाहनांच्या साहित्याचीही चोरी वाढत आहेत. विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची वाहने जिल्हा परिषद आवारात उभी केली जातात. येथून दुचाकी वाहने चोरुन नेल्याच्या घटना घडत आहेत. या सर्व प्रकारावर आळा बसावा म्हणून येथे सुरक्षा रक्षक नियुक्त केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Zip Parking space 'Fix'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.