जि.प. अधिकारी पदाधिकाऱ्यांनी घेतले हातात खराटे
By Admin | Updated: October 11, 2016 00:25 IST2016-10-11T00:25:33+5:302016-10-11T00:25:33+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या आवाहनाला दाद देत जिल्हा परिषदेत शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी..

जि.प. अधिकारी पदाधिकाऱ्यांनी घेतले हातात खराटे
महास्वच्छता अभियान : परिसरात राबविली स्वच्छता मोहीम
अमरावती : केंद्र व राज्य शासनाच्या आवाहनाला दाद देत जिल्हा परिषदेत शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात खराटे घेऊन जिल्हा परिषद परिसरात महास्वच्छता अभियान राबविले. यावेळी परिसर स्वच्छ करून श्रमदानाने केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या पुढाकाराने स्वच्छ भारत मिशन कक्षा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा परिषद परिसरात महास्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अध्यक्ष सतीश उईके, सीईओ किरण कुलकर्णी, डेप्युटी सीईओ संजय इंगळे, जे.एन. आभाळे, प्रकाश तट्टे, कैलास घोडके, कार्यकारी अभियंता किशोर साकुरे, प्रमोद तलवारे, के.टी. उमाळकर, डीएचओ संतोष माने, मुख्य लेखा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, समाज कल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण आदीसह सर्व अधिकारी व कर्मचारी या महास्वच्छता अभियानात स्वयंस्फूर्तीने यात सहभागी झाले होते. याप्रसंगी परिसरात स्वच्छ करून श्रमदान केले.
या कार्यक्रमानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी सीईओ किरण कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, जिल्हा परिषद परिसरात दर आठवड्याला महास्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. याशिवाय जिल्हा परिषद परिसरात पे अॅन्ड पार्कींगचा विचार प्रशासन करीत आहे यामुळे वाहन चोरी, पेट्रोल चोरी सारख्या घटनांना आळा बसून पार्कींगला शिस्तही लागेल असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला. यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)