जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या पदोन्नतीत घोळ

By Admin | Updated: May 11, 2014 22:46 IST2014-05-11T22:46:41+5:302014-05-11T22:46:41+5:30

जिल्हा परिषदेत शिक्षकांना दिल्या जाणार्‍या मुख्याध्यापक म्हणून पदोन्नतीत प्रचंड घोळ असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

Zilla Parishad's promotion of teachers | जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या पदोन्नतीत घोळ

जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या पदोन्नतीत घोळ

अमरावती : जिल्हा परिषदेत शिक्षकांना दिल्या जाणार्‍या मुख्याध्यापक म्हणून पदोन्नतीत प्रचंड घोळ असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सेवाज्येष्ठतेनुसार नऊ शिक्षकांना मुख्याध्यापकपदी नियुक्ती देणे आवश्यक असताना बिंदुनामावलीचे कारण पुढे करून या शिक्षकांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा डाव रचला जात आहे. प्राप्त माहितीनुसार ५ नोव्हेंबर २०१२ रोजी शिक्षण विभागाने ३९ शिक्षकांना पदोन्नती देण्यास मंजुरी दिली. त्यानुसार ८ नोव्हेंबर २०१२ रोजी माध्यमिक शाळेतील पदोन्नतीस पात्र या ३९ शिक्षकांना मुख्याध्यापकपदी नियुक्ती देण्याची प्रक्रिया पार पडली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी समुपदेशनाअंती २३ शिक्षकांना मुख्याध्यापकपदी नियुक्ती दिली. मात्र, उर्वरित शिक्षकांना अपुर्‍या जागांअभावी मुख्याध्यापकपदी त्वरेने नियुक्ती देणे अशक्य झाले. त्यानंतर काहींनी पदोन्नती नाकारली तर काही शिक्षक सेवानिवृत्त झाले. याच श्रृंखलेत २५ डिसेंबर २०१३ रोजी सेवाज्येष्ठतेनुसार पात्र २९ शिक्षकांना समुपदेशनासाठी बोलाविले.

Web Title: Zilla Parishad's promotion of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.