जिल्हा परिषद, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निदर्शने

By Admin | Updated: August 12, 2015 00:20 IST2015-08-12T00:20:46+5:302015-08-12T00:20:46+5:30

शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबीत असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषद कर्मचारी ..

Zilla Parishad, State Government employees' demonstrations | जिल्हा परिषद, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निदर्शने

जिल्हा परिषद, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निदर्शने

लक्षवेध : विविध मागण्यांकडे वेधले लक्ष
अमरावती : शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबीत असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने जिल्हा परिषदेसमोर तर राज्य सरकारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी दुपारी निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधले आहे.
प्रमुख मागण्यामध्ये ७ महिन्यांचा महागाई भत्ता, ३५ महिन्यांनी भत्याची थकीत बाकी, ६० वर्र्र्षे सेवानिवृत्तीचे वय करावे, सर्व विभागातील रिक्त पदे भरावीत, सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी १ जानेवारी २०१६ लागू करावा, जिल्हा परिषदमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत ग्रामविकास मंत्री यांनी केलेल्या प्रलंबीत मागण्यावर चर्चेनुसार निर्णय घेण्यात यावा, बीडीओ अशा विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आलीत. आंदोलनात राज्य सहकारी कर्मचारी संघटनेचे व्ही.एन.देविकर, दामोदर पवार, एस.डी. कपाळे, श्रीकृष्ण माहोरे, डी.डी. फिसके, जि.प. कर्मचारी पकंज गुल्हाने, ज्ञानेश्र्वर घाटे, अमोल कावरे, ऋषिकेश कोकाटे, प्रशांत धर्माळे, श्रीकांत मेश्राम, मंगेश मानकर, योगेश मालखेडे, समीर चौधरी, धनश्याम चोरे, राहुल खेडकर, उमेश बाबल, अजाबराव पाखरे, पकंज आसरे, शिल्पा काळमेघ, अभ्यंकर, तांबळे आदींचा समावेश होता.

Web Title: Zilla Parishad, State Government employees' demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.