जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर ?
By Admin | Updated: December 18, 2015 00:29 IST2015-12-18T00:29:19+5:302015-12-18T00:29:19+5:30
गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच घसरण असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांची खालावत चाललेली पटसंख्या चितेंची बाब ठरली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर ?
३०८ शाळा बंदच्या मार्गावर : जिल्ह्यात जि.प.च्या १६०१ शाळा
अमरावती : गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच घसरण असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांची खालावत चाललेली पटसंख्या चितेंची बाब ठरली आहे. जिल्ह्यातील ३०८ शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. कमी पटसंख्येच्या या शाळा बंद होण्याचीही शक्यता असून तसे झाल्यास या शाळांतील शिक्षकांना नाईलाजाने दुसऱ्या शाळेची वाट धरावी लागणार आहे.
ज्या शाळांची पटसंख्याअरयंत कमी आहे.त्या बंद करण्याच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत खुलासा केला आहे. शिक्षकांचे वेतन सुरू असल्यामुळे अशा अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासाठी शासन हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे १ हजार ६०१ शाळा आहेत. त्यामधील ३०८ शाळा २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा आहेत. यामध्ये सर्वाधिक शाळा अमरावती तालुक्याकत ४६ आणि सर्वात कमी शाळा महापालिका क्षेत्रात ४ आहेत. यासह इतर तालुक्यात वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. त्यामुळे या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी असे झाल्यास जिल्हा परिषदेचे ेजवळपास ८०० शिक्षकांचेही समायोजन शिक्षण विभागाला करावे लागणार आहे.