वरूड तालुक्यात जिल्हा परिषद सदस्याची पत्नी पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST2021-01-19T04:16:45+5:302021-01-19T04:16:45+5:30

फोटो पी १८ वरूड फोल्डर वरूड : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये ३६३ सदस्यांकरिता सोमवारी मतमोजणी झाली. ९२४ उमेदवार रिंगणात होते. ...

Zilla Parishad member's wife defeated in Warud taluka | वरूड तालुक्यात जिल्हा परिषद सदस्याची पत्नी पराभूत

वरूड तालुक्यात जिल्हा परिषद सदस्याची पत्नी पराभूत

फोटो पी १८ वरूड फोल्डर

वरूड : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये ३६३ सदस्यांकरिता सोमवारी मतमोजणी झाली. ९२४ उमेदवार रिंगणात होते. पुसला येथे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांच्या पत्नी रेखा पाटील आणि सरपंच पती सुनील चिमोटे पराभूत झाले. राजुरा बाजार येथे पंचायत समिती सदस्य सिंधू कर्नाके आणि पेठ मांगरूळी, सावंगी, गणेशपूर येथील मावळते सरपंच पराभूत झाले. लिंगा येथील एकाऐवजी दुसऱ्याची मते मोजल्याचा आक्षेप नोंदवल्याने निकाल राखून ठेवण्यात आला. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. विविध पॅनेलचे सदस्य निवडून आले. वघाळ येथील एका प्रभागामध्ये शबनम वसीम शाह आणि छाया नारायण वाघमारे यांना प्रत्येकी ६८ मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. बनम वासिम शहा विजयी ठरल्या. धनोडी येथे दिलीप भोयर यांचे गटाने बाजी मारली. गणेशपूरमध्ये आमदार भुयार गटाने बाजी मारली. भाजपप्रणीत आघाडीला अनेक ग्रामपंचायतींमध्ये फटका बसला.

---------

Web Title: Zilla Parishad member's wife defeated in Warud taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.