जिल्हा परिषद क्वॉटर्समध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
By Admin | Updated: August 12, 2014 23:29 IST2014-08-12T23:29:18+5:302014-08-12T23:29:18+5:30
शहर कोतवाली पोलीस ठाण्यातंर्गत जिल्हा परिषद क्वॉर्टरमध्ये सोमवारी मध्यरात्री १.३० वाजता दरम्यान चोरट्यांनी धुमाकुळ घातला. जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या बंगळ्याजवळच हा प्रकार घडला.

जिल्हा परिषद क्वॉटर्समध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
अमरावती : शहर कोतवाली पोलीस ठाण्यातंर्गत जिल्हा परिषद क्वॉर्टरमध्ये सोमवारी मध्यरात्री १.३० वाजता दरम्यान चोरट्यांनी धुमाकुळ घातला. जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या बंगळ्याजवळच हा प्रकार घडला. तेथील दोन घरांची दारे चोरट्यांनी तोडली. चोरट्यांचा शोध घेताना नाागरिकांनी रात्र जागून काढली.
मालटेकडी लगतच्या जिल्हा परिषद क्वॉर्टरमध्ये जिल्हा परिषदेचे कर्मचारी व सदस्य वास्तव्यास आहेत. काही दिवसांपासून क्वार्टर परिसरात दोन वेळा चोरीचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
यापूर्वीच कर्मचारी व जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी पोलीस विभागाकडे चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे जिल्हा परिषद क्वॉर्टर परिसरात पोलिसांनी गस्त वाढविली होती. मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुन्हा चोरट्यांनी येथे सोमवारी मध्यरात्री धुमाकुळ घातला. मध्यरात्री दरम्यान चोरट्यांनी एका घराचे दार तोडले तर दुसऱ्या घराचे दार तोडण्याचा प्रयत्न केला.
यादरम्यान नागरिकांना दार तोडण्याचे आवाज आल्यामुळे काही नागरिकांनी झोपेतून उठून बाहेर निघाले. त्या ठिकाणी ५ ते ६ अनोळखी नागरिक परिसरात फिरत असल्याचे निर्देशनास आले. नागरिकांंनी त्या चोरट्यांना हटकले असता चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्या चोरट्यांपैकी एका चोरट्याला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.