झेडपीत गैरकारभार लपविण्याची कसरत

By Admin | Updated: September 30, 2015 00:38 IST2015-09-30T00:38:17+5:302015-09-30T00:38:17+5:30

राज्य विधानमंडळाची पंचायतराज समिती जिल्हा परिषदेला आगामी २७ ते २९ आॅक्टोबर या कालावधीत भेट देणार आहे.

Zepp's work to hide misconduct | झेडपीत गैरकारभार लपविण्याची कसरत

झेडपीत गैरकारभार लपविण्याची कसरत

प्रशासनात धडकी : पंचायतराज समितीचा दौरा निश्चित
लोकमत विशेष

जितेेंद्र दखने ल्ल अमरावती
राज्य विधानमंडळाची पंचायतराज समिती जिल्हा परिषदेला आगामी २७ ते २९ आॅक्टोबर या कालावधीत भेट देणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या खातेप्रमुखांपासून तर मुख्यालयापर्यंतची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. समितीचा दौरा एक महिना लांबणीवर असला तरी प्रशासकीय कामातील अनियमितता कुठेही बाहेर येऊ नये, यासाठी अधिकारी व कर्मचारी आतापासून बारकाईने कामकाज करीत आहे.
विधानमंडळाची पंचायत राज समिती जिल्हा परिषदेला भेट देणार आहे. त्यामुळे सन २००८-०९ आणि २०११-१२ चे लेखापरीक्षण अहवाल तसेच २०१२-१३ चा वार्षिक प्रशासन अहवालावर मुख्यकार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समितीस्तरावर गटविकास अधिकाऱ्यांची साक्ष घेणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व खातेप्रमुखांची मंगळवारी मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी बैठक घेऊन पंचायतराज समितीच्या बैठकी व भेटीच्या अनुषंगाने आवश्यक तयारी, अभिलेखे अद्ययावत ठेवणे, प्राप्त परिच्छेदांची तपासणी करून अहवाल तयारीची प्रक्रिया सुरू आहे. पंचायत राज समिती दौऱ्यात आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी, वसतिगृह, पंचायत समिती कार्यालय आदी ठिकाणी भेटी देणार आहेत. त्यामुळे यासर्व ठिकाणी नियमित स्वच्छता व सुरक्षितता ठेवण्यात येत आहे. विशेष म्हणजे पंचायतराज समितीचा विभागांनी धसका घेतल्यामुळे कामकाजातील अनियमितता उघडकीस न येता असे प्रकार झाकण्यासाठी अनेकजण कामाला लागले आहेत.

पीआरसीचा दौरा धडकला
विधानमंडळ सचिवालयाची सुमारे १५ आमदारांची पंचायतराज समिती अमरावती जिल्हा परिषदेसह, पंचायत समिती, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य ठिकाणी भेटी देणार असल्याने ही समिती २७ ते २९ आॅक्टोबर अशा तीन दिवसांचा दौरा जिल्ह्यात राहणार असल्याचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाकडे धडकले आहे.

या विभागात लगबग सुरू
पंचायतराज समितीच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन, लघुसिंचन, समाज कल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, पंचायत शिक्षण, निरंतर शिक्षण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला व बालकल्याण, आरोग्य, बांधकाम, वित्त आदी विभागांसह अचलपूर, धारणी, चिखलदरा, मोर्शी, वरूड, तिवसा, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्र्वर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, अमरावती, भातकुली आदी पंचायत समितीच्या ठिकाणी जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Web Title: Zepp's work to hide misconduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.