युवा स्वाभिमानची जिल्हा कचेरीवर धडक

By Admin | Updated: May 14, 2016 00:04 IST2016-05-14T00:04:45+5:302016-05-14T00:04:45+5:30

महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची अल्पावधीतच शासनाने केलेली बदली तातडीने रद्द करावी.

Yuva Swabhiman's district attacked the district | युवा स्वाभिमानची जिल्हा कचेरीवर धडक

युवा स्वाभिमानची जिल्हा कचेरीवर धडक

निवेदन : चंद्रकांत गुडेवारांची बदली रद्द करण्याची मागणी
अमरावती: महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची अल्पावधीतच शासनाने केलेली बदली तातडीने रद्द करावी. प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बदलीची नैतिक जबाबदारी स्विकारून पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी शुक्रवारी युवा स्वाभिमान संघटनेने जिल्हाकचेरीवर धडक दिली.
महापालिकेत गुडेवार यांनी आयुक्त पदाची सूत्र स्वीकारली तेव्हापासून कारभारात पारदर्शकता व भ्रष्टाचाराला आळा बसला. शहर विकासाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली.मात्र अचानक कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले चंद्रकांत गुडेवार यांची शासनाने बदली केली. ही बदली त्वरित रद्द करावी, अशी मागणी युवा स्वाभिमान संघटनेने निवासी जिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे केली आहे. यावेळी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, बबन रडके, अनुप अग्रवाल, अभिजित देशमुख, रौनक किटूकले, अंकुश ठाकरे, दिलीप वऱ्हाडे, अनिल कडू, निलेश मेश्राम, गौतम हिरे, अंकुश गणेशपुरे, सुनील धांडे, अनिल खारोडे, प्रकाश कठाणे, सतीश मिश्रा, संजय गायकवाड, मंगेश कोेकाटे, संतोष कोलटके, राजेश वानखडे, महेश किल्लेकर, चंद्रकांत जावरे, प्रशांत कावरे, विलास वाडेकर, सिध्दार्थ बनसोड, सचिन भेंडे, अजाब वऱ्हेकर, ज्योती सैरीसे, सुमिती ढोके, अश्विनी झोड आदींचा सहभाग होता.


पोलिसांसोबत शाब्दिक वाद
युवा स्वाभिमान संघटनेने गुडेवार यांची बदली रद्द करावी, यासाठी शुक्रवारी राजकमल चौकातून रॅली काढली. दुपारी १ वाजता ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचली. जिल्हाधिकारी गीत्ते यांना निवेदन देण्यासाठी युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाकडे आगेकुच केली. मात्र गित्ते हे काही कामानिमित्त बाहेर असल्याने कार्यकर्त्यानी येथे ठिय्या मांडला. कालातंराने निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर चिकटविण्याच्या प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न पोलीस हाणून पाडत असताना शाब्दिक वाद झाला.

राजकमल चौकात निदर्शने
महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची अचानक बदली झाल्याने ही बदली त्वरित रद्द करावी, यासाठी युवा स्वाभिमान संघटनेने राजकमल चौकात निदर्शने केली. त्यानंतर युवा स्वाभिमान पदाधिकाऱ्यांनी शहराच्या विविध भागातून रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

Web Title: Yuva Swabhiman's district attacked the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.