शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वरूडच्या युवराजला ‘राष्ट्रीय कलारत्न’ पुरस्कार, अपंगत्वार केली मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 7:40 PM

शारीरिक व्यंगावर मात करीत आपल्या कलेची रसिकांच्या मोहिनी करणारा तालुक्यातील ढगा येथील चित्रकार युवराज ठाकरे यास राष्ट्रीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

- संजय खासबागे  अमरावती  : शारीरिक व्यंगावर मात करीत आपल्या कलेची रसिकांच्या मोहिनी करणारा तालुक्यातील ढगा येथील चित्रकार युवराज ठाकरे यास राष्ट्रीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. हा सोहळा ११ नोव्हेंबर रोजी राजस्थानात होत आहे.  युवराजने भावनाप्रधान व वस्तुदर्शक चित्रांतून सामाजिक परिस्थितीचे यथार्थ दर्शन घडविले आहे. स्त्री अत्याचार, बेटी बचाव यांसारख्या विषयांवर त्याने रेखाटलेल्या चित्रांची विविध ठिकाणी प्रशंसा झाली आहे. त्याने तासन्तास खुर्चीत बसून स्केच रंगविले. हुबेहूब चित्र साकारण्यात त्याचा हातखंडा आहे. अनेक चित्रप्रदर्शनात सहभाग नोंदवित असतानाच नवी दिल्ली येथे अमनदीपसिंग बसीर यांच्या आर्ट गॅलरीत युवराजच्या चित्रांना स्थान मिळाले. येथून युवराजच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. दिल्ली, पंजाब, चंदीगढ, पश्चिम बंगाल, राजस्थानसह विविध राज्यांतील आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्तरावरील कला प्रदर्शनांमध्ये युवराजच्या चित्रांना स्थान मिळाले आहे. दोन आंतराष्ट्रीय, पाच राष्ट्रीय पुरस्कार तसेच तीन सुवर्ण, दोन रजत व दोन कांस्यपदकांचा मानकरी ठरलेल्या युवराजला राजस्थानातील राष्ट्रीय कलापर्व के्रयान्स टेक या संस्थेने यंदाचा ‘राष्ट्रीय कलारत्न पुरस्कार’ जाहीर केला आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण गावातचयुवराज आनंद ठाकरे दोन्ही पायाने अपंग आहे. शिक्षणाची व चित्रकलेची आवड पाहून वडिलांनी त्याचे शिक्षण सुरू ठेवले. गावातील शाळेत बारावी केल्यानंतर अमरावती येथून एटीडी व डीडीआर अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला. सध्या तो ढगा येथील स्व.सरस्वताबाई ठाकरे विद्यालयातील विद्यार्थ्याना चित्रकलेचे धडे देतो.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र