भुलेश्वरी नदीत युवक वाहून गेला

By Admin | Updated: June 18, 2015 00:15 IST2015-06-18T00:15:18+5:302015-06-18T00:15:18+5:30

शौचासाठी गेलेला वीस वर्षीय युवक नदीपात्रात पडून वाहून गेल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास...

Youth were carried away in Bhuleshwari river | भुलेश्वरी नदीत युवक वाहून गेला

भुलेश्वरी नदीत युवक वाहून गेला

दर्यापूर : शौचासाठी गेलेला वीस वर्षीय युवक नदीपात्रात पडून वाहून गेल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास येथील भुलेश्वरी मंदिराजवळील नदीपात्रात घडली.
वाहून गेलेल्या युवकाचे नाव शेख नवेद शे.इफजुल (२०,रा. टाटानगर) असे आहे. दर्यापूर शहरासह तालुक्यात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भुलेश्वरी नदीला सुध्दा पूर आला होता. नदीचे पाणी वाहते होते. टाटानगर येथील रहिवासी शेख नवेद शेख इफजुल हा दुपारी शौचासाठी नदीपात्रात गेला होता. त्याचा तोल गेल्याने तो नदीत पडला व वाहून गेला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पुरात वाहून गेलेल्या युवकाचा शोध सुरुच आहे. वृत्त लिहेस्तोवर त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता. (प्रतिनिधी)

Web Title: Youth were carried away in Bhuleshwari river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.