पोलीस सूत्रानुसार, यश लाड व पीयूष काळे हे एमएच २७ सीएन ६७८६ या दुचाकीने नरखेड येथे गेले होते. तेथून यश एकटा परतत असताना रात्री ९.३० च्या सुमारास गणेशपूर पुलाजवळ उभ्या असलेल्या चौघांपैकी एकाने यशला हात दाखविला. मात्र, भीती वाटल्याने तो थांबला नाही. त्यामुळे चारपैकी एका आरोपीने यशच्या दिशेने काठी फेकली. ती डोक्याला लागल्याने यश दुचाकीसह खाली कोसळला. लगोलग चारही आरोपी त्याचेजवळ पोहोचले. पैकी एकाने त्याच्या पायावर काठी मारली. दुसऱ्याने त्याच्या खिशातील रोख व मोबाईल काढून घेतला. याप्रकरणी वरूड पोलिसांनी ३० डिसेंबर रोजी दुपारी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
गणेशपूर मोवाड मार्गावर तरुणाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:34 IST