वाहनास धक्का लागल्याने युवकालाचाकूच्या मुठीने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST2021-03-13T04:22:46+5:302021-03-13T04:22:46+5:30
अमरावती : विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाचा धक्का लागल्याने या कारणावरून वाद करून एका युवकाला आरोपीने संगनमत करून चाकूच्या मुठीने ...

वाहनास धक्का लागल्याने युवकालाचाकूच्या मुठीने मारहाण
अमरावती : विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाचा धक्का लागल्याने या कारणावरून वाद करून एका युवकाला आरोपीने संगनमत करून चाकूच्या मुठीने मारहाण करण्यात आल्याची घटना अकबर नगरातील मशीदजवळील चक्कीजवळ घडली.
या प्रकरणी आरोपी गोलू ( रा. अकबरनगर), नइम, एक अनोळखी इसम असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी सुमेर खान हुसेन खान (२२, रा. गुलीस्तानगर) यांनी नागपुरीगेट ठाण्यात तक्रार नोंदविली. आरोपीविरुद्ध भादविची कलम ३२४, ५०४,३४ अन्वये गुन्हा नोंदविला. पोलीससुत्रानुसार फिर्यादी व जखमी शेख कलीम शेख करीम दुचाकीने पाण्याची कॅन घेवून गुुलीस्तानगरकडून यास्मिननगरकडे अकबर नगर मार्गे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाचा धक्का लागल्याने वाहन पाहत असताना यातील आरोपीने फिर्यादी यांच्याशी संगनमत करून शिवीगाळ केली. तसेच युवकाच्या कपाळावर चाकूच्या मुठीने मारुन जखमी केले. तसेच फिर्यादी व जखमीस लाथाबुक्याने मारहाण केली. त्यामुळे मोबाईल व पैसे खाली पडले.