तिवसा येथील युवकाचा मारहाणीत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST2021-06-03T04:10:07+5:302021-06-03T04:10:07+5:30
तिवसा : शहरातील रहिवासी युवकाची काठ्यांनी मारहाण करून हत्या करण्यात आल्याची तक्रार कुऱ्हा पोलीस ठाण्यात देण्यात आली. या तक्रारीवरून ...

तिवसा येथील युवकाचा मारहाणीत मृत्यू
तिवसा : शहरातील रहिवासी युवकाची काठ्यांनी मारहाण करून हत्या करण्यात आल्याची तक्रार कुऱ्हा पोलीस ठाण्यात देण्यात आली. या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली.
पोलीस सूत्रांनुसार, अजय अशोकराव माळोदे (३३, रा. तिवसा) असे मृताचे नाव आहे. आमला विश्वेश्वर (ता. चांदूर रेल्वे) येथे मामा अच्युतराव डोंगरे यांच्या शेतात तो राबत होता. तो ३० मे पासून बेपत्ता होता. ३१ मे रोजी त्याचा मृतदेह आमला येथील स्मशानात पडून असल्याची माहिती माळोदे कुटुंबाला मिळाली. त्याच्या शरीरावर मारहाणीचे वळ होते. छातीवर काळे घट्टे होते. डोक्यातून रक्त येत होते. याप्रकरणी आनंद किन्नाके, आशिष किन्नाके, ज्ञानदीप वानखडे (४०) व एकनाथ गोफणे (रा. आमला विश्वेश्वर) यांच्या विरुद्ध कुऱ्हा पोलिसांनी भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा मंगळवारी दाखल केला. या प्रकरणाची फिर्याद त्याच्या धाकट्या भावाने दिली.