युवा स्वाभिमानची आज विदर्भस्तरीय दहिहंडी
By Admin | Updated: August 27, 2016 23:59 IST2016-08-27T23:59:23+5:302016-08-27T23:59:23+5:30
आ.रवी राणाप्रणित युवा स्वाभिमानची विदर्भस्तरीय दहिहंडी कार्यक्रम रविवार २८ आॅगस्ट रोजी होत आहे.

युवा स्वाभिमानची आज विदर्भस्तरीय दहिहंडी
स्वतंत्र विदर्भाला समर्पित : 'सैराट' चित्रपट टीम येणार
अमरावती: आ.रवी राणाप्रणित युवा स्वाभिमानची विदर्भस्तरीय दहिहंडी कार्यक्रम रविवार २८ आॅगस्ट रोजी होत आहे. राजापेठ चौकात सकाळी १० वाजतादरम्यान सुरू होणाऱ्या या दहिहंडी उत्सवादरम्यान आ. रवि राणा यांच्या मुलासह ४ आॅगस्टला जन्मलेल्या १०० मुलांचे नामकरण होणार आहे. हा नामकरण सोहळा सर्वधर्मीय धर्मगुरु आणि लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत होईल.
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सैराट या मराठी चित्रपटातील कलाकारांसह अन्य कलावंत स्पर्धेचे मुख्य आकर्षण राहणार आहे. दहीहंडी स्पर्धेसाठी राजापेठ चौक सज्ज झाला आहे. पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात ही दहिहंडी स्पर्धा होणार आहे.
ज्या मुला-मुलींचे नामकरण या दहिहंडी स्पर्धेत होईल, त्यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांना कपडे आणि आर्थिक मदत दिली जाईल. दहिहंडी स्पर्धेदरम्यान कृष्ण व राधा सजावट, नूत्य, नाट्य, संगीत अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे छायाचित्रिकरण करणाऱ्या १० उत्तम छायाचित्रकारांना पारितोषिकाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्या उत्तम छायाचित्रांचे प्रदर्शनही भरविले जाणार आहे. या दहिहंडीला आर्ची आणि परशा ही सैराटमधील जोडगोळी येणार असल्याने ही स्पर्धा पाहण्यासाठी अभूतपूर्व गर्दी उसळण्याची शक्यता आहे. काही वर्षांपासून बडनेरा मतदार संघाचे आ.रवी राणा हे सातत्याने या विदर्भस्तरीय दहिहंडी स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. अमरावतीत होणाऱ्या अन्य स्पर्धेच्या तुलनेत राणा यांची दहिहंडी स्पर्धा विविध अर्थाने वेगळी असते. लाखोंची बक्षिसे चित्रपट तारे-तारकांच्या उपस्थितीने दहिहंडी स्पर्धेला प्रत्येक वर्षी अभूतपूर्व गर्दी उसळते यंदाही सैराट टीममधील तारे तारकांच्या लाईव्ह संवादासाठी भरेमोठ व्यासपीठ उभारण्यात आले असून डिजिटल स्क्रिन लावण्यात आल्या आहे. या दहिहंडी स्पर्धेचे लाईव्ह टेलिकास्ट होणार असून राणा दाम्पंत्यासह युवा स्वाभिमानची कार्यकारिणी, पदाधिकारी व कार्यकर्ते या उत्सवासाठी झटत आहे.