नदीत बुडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:13 IST2021-04-06T04:13:06+5:302021-04-06T04:13:06+5:30
दर्यापूर : तालुक्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लासूर येथील पूर्णा नदीपात्रात २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ...

नदीत बुडून युवकाचा मृत्यू
दर्यापूर : तालुक्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लासूर येथील पूर्णा नदीपात्रात २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. सचिन रमेश चव्हाण (२४, रा. लोतवाडा, ता. दर्यापूर) असे मृताचे नाव आहे.
सचिन चव्हाण हा सोमवारी सकाळी लोतवाडा येथून मित्रांबरोबर लासूर येथील पूर्णा नदीकाठी गेला असता, नदीतील डोहात त्याचा मृत्यू झाला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, डोह खोल असल्याने त्याला वाचवता आले नाही. घटनेची माहिती येवदा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास येवदा पोलीस करत आहेत.