विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST2021-02-05T05:33:38+5:302021-02-05T05:33:38+5:30

पोलीस सूत्रांनुसार, लक्ष्मण भानुदास वैद्य असे मृताचे नाव आहे. गावापासून काही शेत ओलांडून असलेल्या चंद्रशेखर कडू यांच्या शेतातील विहिरीत ...

Youth dies after falling into well | विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

पोलीस सूत्रांनुसार, लक्ष्मण भानुदास वैद्य असे मृताचे नाव आहे. गावापासून काही शेत ओलांडून असलेल्या चंद्रशेखर कडू यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत मृताचे वडील भानुदास वैद्य यांच्या फिर्यादीसार, २६ जानेवारी रोजी सकाळी तो आईला बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याने त्याची काळजी घेतली जात होती. त्यानुसार बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. नजीकच्या दाट झाडीतही त्याचा शोध घेण्यात आला. दुपारी १ च्या सुमारास काही जणंनी तो चंद्रशेखर कडू यांच्या शेताकडे जाताना दिसल्याचे सांगितले. या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. प्रभारी पोलीस अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास होत आहे.

Web Title: Youth dies after falling into well