रखडलेल्या प्रकल्पांसाठी युवक काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 00:15 IST2016-05-19T00:15:33+5:302016-05-19T00:15:33+5:30
मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील मागील दोन वर्षांपासून रखडलेला आमापाटी, गांगरखेडा, प्रकल्प त्वरित सुरू करावा

रखडलेल्या प्रकल्पांसाठी युवक काँग्रेस आक्रमक
निवेदन : कामे सुरू करण्याची मागणी
अमरावती : मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील मागील दोन वर्षांपासून रखडलेला आमापाटी, गांगरखेडा, प्रकल्प त्वरित सुरू करावा आणि आदिवासी प्रकल्पग्रस्तांना तातडीने वाढीव मोबदला देण्यात यावा, या विषयावर बुधवारी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत माजी आमदार केवलराम काळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांना निवेदन सोपवून ही कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
मागील दोन वर्षांपासून आमपाटी व कोरडा प्रकल्प रखडून पडला आहे. या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत. अशा गांगरखेडा, साझा व कोरडा साझा येथील शेतकऱ्यांना रेडीरेकनरनुसार समप्रमाणात मोबदला देणे अपेक्षित असताना असे झाले नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी लगतच्या साझानुसार गांगरखेडा साझ्यातील शेतकऱ्यांना १ लाख ६० हजार आणि कोरडा साझ्यातील शेतक ऱ्यांना २ लाख २५ हजार याप्रमाणे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यात यावा, अशी मागणी यावेळी माजी आमदार केवलराम काळे, जि.प. सदस्य महेंद्रसिंग गैलवार, श्रीपाल पाल, मिश्रीलाल झारखंडे, पुण्याजी येवले, गौरव काळे, राहुल येवले, पीयूष मालविय आदींच्या उपस्थितीत केली.