दुधाच्या टँकरमध्ये बसून तरुण पोहोचले अंबानगरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:01 IST2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:01:04+5:30
देशात लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही दुधाच्या टँकरमध्ये बसून भुसावळ येथील दोन तरुण अंबानगरीत पोहोचले. सदर तरुण हे सकाळी ७ वाजता भुसावळवरून निघाले. सांयकाळी ५.३० वाजता ते क्रीडा संकुल येथे पोहोचताच गाडगेनगर येथील सहायक पोलीस निरीक्षक पूजा खांडेकर यांनी त्यांना हटकले.

दुधाच्या टँकरमध्ये बसून तरुण पोहोचले अंबानगरीत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणूचे संकट नागरिकांना पुरते कळलेले नाही, अशी घटना सोमवारी उघडकीस आली. दुधाच्या टँकरमध्ये बसून दोन युवकांनी अमरावती गाठली. घरी जाण्याच्या बेतात असलेल्या या युवकांना पोलिसांनी हटकले तेव्हा त्यांचा प्रवास उघड झाला.
देशात लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही दुधाच्या टँकरमध्ये बसून भुसावळ येथील दोन तरुण अंबानगरीत पोहोचले. सदर तरुण हे सकाळी ७ वाजता भुसावळवरून निघाले. सांयकाळी ५.३० वाजता ते क्रीडा संकुल येथे पोहोचताच गाडगेनगर येथील सहायक पोलीस निरीक्षक पूजा खांडेकर यांनी त्यांना हटकले. आपण जमील कॉलनीतील रहिवासी असल्याचे एकाने सांगितले. मीर कासीम मीर असगर अली (३२), सय्यद अहमद (२७) अशी नावे सांगितली. भुसावळ येथे व्यवसाय करतो. लॉकडाऊन असल्याने घरी जात असल्याचे सांगितले. पुढे निघून गेलेल्या युवकाला फोन करून थांबविण्यात आले. पोलिसांनी त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला व आताच इर्विन रुग्णालयात जाऊन तपासणी करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी तंबी दिली.