युवा सेनेचे आरटीओ कार्यालयात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:41 IST2018-06-01T22:41:11+5:302018-06-01T22:41:11+5:30
राजकमल चौक ते बडनेरापर्यंत अनेक आॅटोरिक्षाचालक प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करीत आहेत. यामध्ये गुंड प्रवृत्तीचे काही लोक शिरले असून, त्यांना त्वरित लगाम घाला, अन्यथा अधिकाऱ्यांची खैर नाही, असा इशारा देत युवा सेनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करण्यात आले.

युवा सेनेचे आरटीओ कार्यालयात आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजकमल चौक ते बडनेरापर्यंत अनेक आॅटोरिक्षाचालक प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करीत आहेत. यामध्ये गुंड प्रवृत्तीचे काही लोक शिरले असून, त्यांना त्वरित लगाम घाला, अन्यथा अधिकाऱ्यांची खैर नाही, असा इशारा देत युवा सेनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करण्यात आले.
युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल माटोेडे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून आरटीओच्यावतीने कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. आॅटो परवाना तपासणी करणे गरजेचे झाले आहे. अनेक आॅटो चालकांकडे कुठलेही लायसन्स व परवाना नसताना नियमबाह्य आॅटो चालवुन नागरिकांची लूट करण्यात येत असल्याचे माटोडे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते यांनी माहिती दिली व अधिकाऱ्यांनी एसीमध्ये न बसता रस्त्यावरील लोकांच्या अडचणी काय आहेत, ते समजून काम केले पाहिजे, अन्यथा अधिकाऱ्यांनी शिवसेना स्टाइलमध्ये उत्तर देण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल माटोडे, शैलेश चव्हाण, शिवा सदाफळे, कार्तिक गजभिये, सचिन उमक, मिथून सोळंके, कृ ष्णा गवाळे, शंतनु जुनघरे, संतोष ठाकूर, सागर शर्मा, प्रवीण वाकेकर, गजू सांगोले आदींची उपस्थिती होती.