आपले मतदान, लोकशाहीचा प्राण!
By Admin | Updated: October 11, 2014 22:57 IST2014-10-11T22:57:54+5:302014-10-11T22:57:54+5:30
विधानसभा निवडणुकीत अधिक मतदान होण्यासाठी तालुका प्रशासनाच्यावतीने येथे मतदार जागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

आपले मतदान, लोकशाहीचा प्राण!
मतदार जागृती रॅली : विद्यार्थ्यांचा सहभाग
भातकुली : विधानसभा निवडणुकीत अधिक मतदान होण्यासाठी तालुका प्रशासनाच्यावतीने येथे मतदार जागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषवाक्यांच्या गजराने सारा आसमंत दुमदुमला होता.
तालुका प्रशासनाच्यावतीने येथील छोगालाल राठी गुरूकुल विद्यालयाच्या प्रांगणातून मतदार जागृती रॅली काढण्यात आली. यावेळी तहसीलदार अजितकुमार येळे, नायब तहसीलदार रवी महाले, गटशिक्षणाधिकारी जयश्री राऊत, तलाठी संतोषसिंह गील, गटसमन्वयक नरेंद्र धनस्कर, प्राचार्य अजीज रिजवी, मुख्याध्यापिका पन्ना बोरा, पोलीस पाटील रवींद्र खांडेकर, केंद्रप्रमुख हुसेनीसह आदींचा सहभाग होता.
रॅलीत छोगालाल राठी गुरूकुल विद्यालय, जडावबाई राठी कन्या विद्यालय, ज्ञानेश्वर पवार कनिष्ठ महाविद्यालय, राष्ट्रीय एकता उर्दू हायस्कूल, जिल्हा परिषद मुलांची व मुलींची मराठी शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा, आदर्श इंग्लिश स्कूल, आदिवासी आश्रमशाळांचे दोन हजार विद्यार्थ्यांसह सर्व मुख्याध्यापक, बीएलओ, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
शहराच्या प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. दानात दान एकच दान, चला करु या मतदान, आपले मतदान लोकशाहीचा प्राण, मतदान करु देश घडवू, जागरूक नागरिक होऊ, अशा विविध घोषवाक्यांच्या गजराने आसमंत दुमदुमला होता. छोगालाल राठी गुरुकुल विद्यालयाच्या प्रांगणात या रॅलीचा समारोप झला. यावेळी तहसीलदार अजितकुमार येळे, गटशिक्षणाधिकारी जयश्री राऊत, अजीज रिजवी, सुरेश ठाकूर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत बहुसंख्येने मतदान करुन लोकशाही व्यवस्था बळकट करण्याचे आवाहन केले. (तालुका प्रतिनिधी)