शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

फोनवरुन धमकी, "तुमच्या मुलीचे लग्न मोडतो, लग्नात धिंगाणाच घालतो"; विनयभंगाचा गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: March 15, 2024 17:44 IST

मैत्री तोडल्यानंतरही टगेगिरी : ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी

अमरावती : माझ्याशीच लग्न कर, अन्यथा लग्नात शिरून प्रेयसीच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकण्याची गर्भित धमकी देण्यात आली. १४ मार्च रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी, खोलापुरी गेट पोलिसांनी १४ मार्च रोजी आरोपी अंकुश वसुकार (रा. अमरावती) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.             

तक्रारीनुसार, यातील फिर्यादी व आरोपी एकमेकांचे ओळखीचे आहेत. एकाच परिसरात राहत असल्याने त्या दोघांत लहानपणापासून मैत्रीदेखील होती; पण काही दिवसांपूर्वी तरुणीने आरोपीसोबत मैत्री तोडली. मात्र, ते तो स्वीकारू शकला नाही. दरम्यानच्या काळात तरुणीचे समाजातील एका अन्य मुलाशी लग्न जुळले. ती बाब आरोपीलादेखील लगेचच कळली. त्यावेळी आरोपीने फिर्यादी तरुणीची भेट घेऊन तिला लग्न मोडण्याचा सल्ला दिला. त्याने आपल्या जुन्या मित्रत्वाच्या व प्रेमसंबंधांच्या आणाभाका तिला दिल्या. मात्र, आता ते शक्य नाही, आपली केवळ मैत्रीच होती, असे तिने त्याला बजावले. त्यावर माझ्याशी लग्न कर, नाही तर तुझ्या तोंडावर ॲसिड टाकून तुला मारून टाकेन, अशी धमकी तिला दिली.

तुमच्या मुलीचे लग्न मोडतोआरोपी अंकुश एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तरुणीच्या वडिलांना मोबाइल काॅल करून तुमच्या मुलीचे लग्न मोडतो. तिचे आणि माझे सोबत फोटो आहेत. ते मुलाकडील लोकांना पाठवितो. तिचे लग्न माझ्यासोबत करा, नाही तर लग्नात येऊन ॲसिड टाकीन व धिंगाणा घालीन, अशा धमक्या दिल्या. तथा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तो त्रास असह्य झाल्याने अखेर तिने खोलापुरी गेट पोलिस ठाणे गाठले.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस