टिप्परखाली चिरडून तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 23:38 IST2018-01-21T23:37:56+5:302018-01-21T23:38:27+5:30

वडाळीच्या बांबू गार्डनची सैर करून परत जाताना टिप्परखाली चिरडून चांदूरबाजार येथील रहिवासी तरुण ठार झाला.

Youngsters killed by tipper | टिप्परखाली चिरडून तरुण ठार

टिप्परखाली चिरडून तरुण ठार

ठळक मुद्देपरिहारपुरा मार्गावरील घटना : बांबू गार्डनमधून परत येताना अपघात

आॅनलाईन लोकमत
अमरावती : वडाळीच्या बांबू गार्डनची सैर करून परत जाताना टिप्परखाली चिरडून चांदूरबाजार येथील रहिवासी तरुण ठार झाला. ही घटना रविवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास बांबू उद्यान मार्गावरील परिहारपुऱ्याजवळ घडली. ऋषीकेश देवदास तायडे (१८,रा. चांदुरबाजार) असे मृताचे नाव आहे. या अपघातात ऋषिकेशचा मित्र समशुल्ला हक अब्दुला हक (२१, रा. बडनेरा) हा किरकोळ जखमी झाला.
ऋषीकेश व समशुल्ला हक हे क्रिकेटच्या छंदातून मित्र बनले होते. अन्य तीन मित्रांसोबत ते रविवारी दुपारी आपआपल्या दुचाकीने बांबू गार्डनला गेले. शहराकडे येत असताना परिहारपुऱ्यानजीक वळण रस्त्यावर ऋषीकेशच्या एमएच २७ वाय-९७२६ क्रमांकाच्या दुचाकीने संतुलन बिघडले आणि तो विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच २७ एक्स ६६०३ क्रमांकाच्या चाकाखाली आला. त्याचा मित्र समशुल्ला हक हा रस्त्यावर पडला. ऋषीकेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर समशुल्ला किरकोळ जखमी झाला. पोलिसांनी चालक जानकीलाल बेनिवाले (४९,रा. वडाळी) याला अटक केली आहे.

Web Title: Youngsters killed by tipper