तरुणीला गर्भपात करण्यास केले प्रवृत्त, लग्नाला नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST2021-04-22T04:13:34+5:302021-04-22T04:13:34+5:30
अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर गर्भपात करण्यास प्रवृत्त करून लग्न करण्यास नकार दिल्याची ...

तरुणीला गर्भपात करण्यास केले प्रवृत्त, लग्नाला नकार
अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर गर्भपात करण्यास प्रवृत्त करून लग्न करण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील पोलीस मुख्यालय क्वार्टरनजीक २०२० ते २८ मार्च २०२१ दरम्यान घडली.
याप्रकरणी आरोपी शुभम संतोष इंगळे (२६, रा. अंबिकानगर) व युवतीला धमकी देणाऱ्या आरोपीचे वडील संतोष इंगळे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा मंगळवारी नोंदविला.
आरोपी शुभमने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती झाली. त्यानंतर तिने शुभमला लग्नासंदर्भात विचारले असता, तिच्या चरित्र्यावर संशय घेऊन किती पैसे पाहिजे सांग, असे म्हटले व गर्भपात करण्यास प्रवृत्त करून लग्न करण्यास नकार दिला. मुलीने ही बाब शुभमच्या वडिलांना सांगितली. मात्र, त्यानेही लग्न करू देत नाही. तक्रार द्यायला गेल्यास बाळाचे कमी जास्त करेन, अशी धमकी संतोषने दिल्याने ती संतापली व अखेर तिने पोलिसांत धाव घेतली. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७६(२),(एन), ४१७, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास पीएसआय मनीषा सामटकर करीत आहेत.