सोयाबीन उत्पादकांच्या मुद्यावर युवा स्वाभिमान आक्रमक

By Admin | Updated: September 30, 2015 00:31 IST2015-09-30T00:31:37+5:302015-09-30T00:31:37+5:30

मागील चार वर्षांपासून खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले.

Young self-esteem aggressive on the issue of soybean growers | सोयाबीन उत्पादकांच्या मुद्यावर युवा स्वाभिमान आक्रमक

सोयाबीन उत्पादकांच्या मुद्यावर युवा स्वाभिमान आक्रमक

आंदोलन : विभागीय आयुक्तांना निवेदन
अमरावती : मागील चार वर्षांपासून खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले. सोयाबीन उत्पादकांना प्रती हेक्टर २० हजार रूपयांप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी व नुकसानग्रस्त भागाचे तातडीने सर्वेक्षण करावे, आदी मागण्यांसाठी मंगळवारी युवा स्वाभिमान संघटनेने आमदार रवी राणा, नवनीत राणा यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक देऊन मागणीचे निवेदन आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांना सोपविले.
यंदा सोयाबीनवर पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले सोयाबीनचे पीक मातीमोल झाले आहे. यामुळे सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रती हेक्टर २० हजार रूपये मदत देण्याची मागणी केली आहे. यावेळी जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, शैलेश कस्तुरे, ज्योती सैरीसे, अनुप अग्रवाल, धीरज केने, मुकेश मालविय उपस्थित होते.

Web Title: Young self-esteem aggressive on the issue of soybean growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.