तरुणांना तृतीयपंथीयांनी नग्न करून केस कापले, व्हिडीओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST2021-03-21T04:13:30+5:302021-03-21T04:13:30+5:30
अमरावती : नकली तृतीयपंथी असल्याच्या संशयावरून खऱ्या तृतीयपंथीयांनी दोन तरुणांना नग्न करून त्यांचे केस कापल्याची धक्कादायक घटना बडनेरा पोलीस ...

तरुणांना तृतीयपंथीयांनी नग्न करून केस कापले, व्हिडीओ व्हायरल
अमरावती : नकली तृतीयपंथी असल्याच्या संशयावरून खऱ्या तृतीयपंथीयांनी दोन तरुणांना नग्न करून त्यांचे केस कापल्याची धक्कादायक घटना बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत निंभोरा येथे शुक्रवारी रात्री घडली.
याचा व्हिडीओ ‘सोशल मीडियावर’ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी तरुणांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी तृतीयपंथीयाविरुद्ध गुन्हा नोंदविला. व्हायरल झालेल्या व्हिडीओत काही तृतीयपंथी तरुणांना नग्न करून त्यांचे केस कापत असल्याचे दिसत आहे. सदर तरुण रडत आपण निर्दोष असल्याचे कथन करीत आहेत. परंतु हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे बदनामी झाल्याचे ते तरुण वारंवार पोलिसांना सांगितल्याने पोलीसही चांगलेच अचंबित झाले.
बाॅक्स
तृतीयपंथीयांचा ताफा सीपी कार्यालयावर
तरुणांनी बडनेरा ठाण्यात तक्रार केल्यानंतर तृतीयपंथीयांच्या व्यवसायातील असली-नकलीचा वाद पुन्हा शनिवारी दुपारी पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचला. खऱ्या तृतीयपंथीयांच्या धाकाने बनावट तृतीयपंथी म्हणून फिरणारे दोन तरुण शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास सीपी कार्यालयात पोहोचले. परंतु त्याचवेळी त्यांचा पाठलाग करीत ऑटोतून २५ ते ३० तृतीतपंथीसुध्दा सीपी कार्यालयात पोहोचल्याने प्रचंड गोंधळ उडाला. तृतीयपंथीयांनी आपबीती पोलिसांसमोर मांडली. त्या तरुणांनीही त्यांच्यासोबत घडलेल्या गंभीर प्रकारचे कथन पोलिसांसमोर केले. अखेर फ्रेजरपुरा पोलिसांनी पाचारण करून दोन तरुणांना तृतीतपंथीयांच्या तावडीतून सोडून फ्रेजरपुरा पोलिसांनी त्यांना ठाण्यात आणले. तृतीयपंथीयांची पोलिसांनी समजूत काढली. त्यानंतर तृतीयपंथी बडनेराकडे रवाना झाले. परंतु तृतीयपंथीयांच्या ताफ्याला पाहून पोलिसांची ताराबंळ उडाली होती.
पोलिसांचा कोट आहे.