The young man was stabbed with a knife | तरुणाला चाकूने भोसकले
तरुणाला चाकूने भोसकले

ठळक मुद्देआनंदनगरातील घटना : जुन्या वैमनस्यावरून हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जुन्या वैमनस्यातून एका तरुणाला चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी आनंदनगरात घडली. अभिजित ऊर्फ गोलू अरुण पार्डीकर (रा.आनंदनगर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. त्याचेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. यात शंकर गायकवाडला अटक करण्यात आली.
गतवर्षी शंकर रामेश्वर गायकवाड (२५,रा. माताखिडकी) यांचे घर जाळण्यात आले होते. याप्रकरणात अभिजित आरोपी होता. या वादाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने शुक्रवारी शंकर व त्याचा मित्र अमोल वाघमारने अभिजितवर चाकू हल्ला चढविला. या घटनेनंतर अभिजीतचा मित्र मिलींद मदतीसाठी घटनास्थळी धावून गेला, तोपर्यंत आरोपींनी पलायन केले. अभिजितने खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी अभिजितला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. एपीआय सतीश इंगळे यांनी अभिजितचे बयाण नोंदविल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: The young man was stabbed with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.