शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

मजनू धडकला युवतीच्या भावी सासरी, सून केल्यास दिली आत्महत्येची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 13:15 IST

तरुणीचे लग्न जुळल्याची बाब विशालच्या कानावर गेली. त्यामुळे तो बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तरुणीच्या नियोजित सासरी पोहोचला. तेथे धिंगाणा घातला.

अमरावती : एकतर्फी प्रेमातून कोण काय करेल, कुणाला धमकी देईल, कुठे पोहोचेल सांगता येत नाही. असाच एक एकतर्फी प्रेम असलेला मजनू चक्क प्रेयसीच्या नियोजित सासरी पोहोचला. लग्न करून तिला सून म्हणून तुम्ही घरात आणाल, तर मी जीवाचे बरेवाईट करेन, अशी धमकी चक्क तिच्या होणाऱ्या सासूबाईला दिली. अखेर त्याचे ते एकतर्फी प्रेम त्याला पोलिस ठाण्यातच घेऊन गेले.   

याप्रकरणी पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास विशाल यादव (रा. गोपालनगर) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, विशाल यादव व तरुणी परस्परांच्या परिचयातील आहेत. तो संबंधित तरुणीचा घरापर्यंत पाठलाग करायचा. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. दरम्यान, एक दिवस ती बाब तरुणीच्या लक्षात आली. सामाजिक बदनामी टाळण्यासाठी तिने त्याला पाठलाग का करतो, अशी विचारणा केली. त्यावर माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तूच हवी आहेस, मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे, असे काहीबाही तो बडबडला. त्यावर तिने त्याला ठामपणे नकार दिला. ते समजून न घेता त्याने एकतर्फी प्रेमातून त्याचे चाळे सुरूच ठेवले.  

रात्री केला धिंगाणा- तरुणीचे लग्न जुळल्याची बाब विशालच्या कानावर गेली. त्यामुळे तो बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तरुणीच्या नियोजित सासरी पोहोचला. तेथे धिंगाणा घातला.- तिचे लग्न झाले, तिला सून म्हणून तुम्ही घरी आणले, तर मी तेव्हाच आत्महत्या करेन, अशी धमकी दिली. ही बाब होणाऱ्या सासूने तरुणीला फोन करून सांगितली. - या घटनेने दोन्ही कुटुंब मात्र विचलित झाले. अखेर तरुणीनेच मनाचा हिय्या करत बुधवारी रात्री पोलिस ठाणे गाठले.

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिस