जुन्या वादातून गळा दाबून युवकाची हत्या!
By Admin | Updated: March 20, 2015 00:12 IST2015-03-20T00:12:01+5:302015-03-20T00:12:01+5:30
जुन्या वादातून युवकाचा गळा दाबूून हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी १८ मार्च रोजी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे.

जुन्या वादातून गळा दाबून युवकाची हत्या!
जरूड : जुन्या वादातून युवकाचा गळा दाबूून हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी १८ मार्च रोजी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे. वरुड रस्त्यावरील बारलगतच्या काटेरी झुडुपात एका २९ वर्षीय युवकाचा मृतदेह गुरूवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली होती. युवकाचा गळा दाबून खून केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविल्यानंतर युवकाच्या मामेभावाने जुन्या वादातून खून झाल्याची तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी दोघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली. शेख वसीम शेख गफूर (२९, रा. शहापूर पुनर्वसन) असे मृताचे नाव आहे.
मृत शेख वसीम याचे महिनाभरापूर्वी गावातील अशोक चंदेल नामक युवकासोबत भांडण झाले होते. या भांडणाचा वचपा काढण्याकरिता १८ मार्च रोजी रात्री वसिमचा गळा दाबून हत्या करून त्याचा मृतदेह झुडुपीत फेकून दिला. घटनास्थळावर मृतदेहाशेजारी एक तुटलेली काठी आढळून आली. मृत संत्रा मंडईमध्ये मजूर पुरवठा करणारा ठेकेदार होता. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्यादरम्यान तो घरातून निघाला होता.