एकतर्फी प्रेमातून तरुणाने कापली हाताची नस
By Admin | Updated: February 24, 2016 00:20 IST2016-02-24T00:20:58+5:302016-02-24T00:20:58+5:30
एकतर्फी प्रेमात नकार मिळाल्यानंतर युवकाने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.

एकतर्फी प्रेमातून तरुणाने कापली हाताची नस
तरूण गंभीर : गाडगेनगर पोलिसांनी केली कारवाई
अमरावती : एकतर्फी प्रेमात नकार मिळाल्यानंतर युवकाने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गिफ्ट सेंटरजवळ घडली. अविनाश सोळंके (२५, रा. रामगाव) असे जखमीचे नाव असून त्याला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अविनाशचे शहरातील एका महाविद्यालयीन तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने अनेकदा त्या तरुणीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. अनेकदा तिचा पाठलाग करून प्रेमाची गळही घातली. सोमवारी अविनाश रामगाववरून अमरावतीला आला. त्यांनी त्या तरुणीला या भागातील एका गिफ्ट सेन्टरनजीक बोलावून प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, मुलीने नकार देताच त्याच्या भावना अनावर झाला. त्याने सोबत आणलेल्या ब्लेडने हाताची नस कापली. घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून रक्तबंबाळ अवस्थेत अविनाशला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तरूणाची प्रकृती गंभीर आहे. (प्रतिनिधी)