टिप्परने कट मारल्याने तरुणाचा खाली पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:12 IST2021-04-05T04:12:05+5:302021-04-05T04:12:05+5:30
अमरावती : ओव्हरटेक करताना टिप्परने कट मारल्याने दुचाकीवरील तरुणाचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ...

टिप्परने कट मारल्याने तरुणाचा खाली पडून मृत्यू
अमरावती : ओव्हरटेक करताना टिप्परने कट मारल्याने दुचाकीवरील तरुणाचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रहाटगाव समोरील संत निरकारी भवनासमोर घडली.
विशाल जानोस्कर असे मृताचे नाव आहे. विशाल हा एमएच २७ बीएच ५२५७ क्रमांकाच्या दुचाकीने कामावरून परत येत होते. दरम्यान टिप्पर क्रमांक एमएच २७ ईएक्स ६१३ ने ओव्हरटेक करताना विशालच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे विशाल रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्याला काही नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची तक्रार फिर्यादी अतुल आनंद सोनटक्के (४० रा. चिचोली गवळी) यांनी नांदगाव पेठ पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी टिप्पर चालकाविरुध्द गुन्हा नोंदविला.