धारखोराच्या डोहात बुडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 01:29 AM2019-08-17T01:29:10+5:302019-08-17T01:29:42+5:30

अमरावती नजीकच्या सुकळी येथून पंधरा ते सोळा मित्रांसोबत निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटनाला गेलेल्या युवकाचा मध्य प्रदेशच्या धारखोरा येथील डोहात बुडून मृत्यू झाला. १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास सदर घटना घडली.

Young man dies in drowning | धारखोराच्या डोहात बुडून युवकाचा मृत्यू

धारखोराच्या डोहात बुडून युवकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमृत सुकळीचा : मित्रांसह सहलीला

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अमरावती नजीकच्या सुकळी येथून पंधरा ते सोळा मित्रांसोबत निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटनाला गेलेल्या युवकाचा मध्य प्रदेशच्या धारखोरा येथील डोहात बुडून मृत्यू झाला. १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास सदर घटना घडली.
शुभम सुधाकर गजबे (२३, रा. सुकळी, ता.जि. अमरावती) असे मृताचे नाव आहे. तो त्याच्या गावातील पंधरा ते सोळा युवकांसोबत मेळघाट जंगलाला लागून मध्य प्रदेशच्या भैसदेही पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या धारखोरा येथील प्रेक्षणीय धबधब्यावर पर्यटनासाठी गेला होता. सर्व मित्रांची हुल्लडबाजी सुरू असताना शुभमचा डोहात बुडून मृत्यू झाला.
सदर घटना जंगलात घडल्यामुळे काही मित्रांनी लागोलाग परतवाडा येथे येऊन सामाजिक कार्यकर्ते किशोर कासार, भूषण फिसके, सौरभ इंगोले, सागर चांदणे, तिरंगा जाधव, उमेश हरदे यांना सदर प्रकार सांगितला. संबंधितांनी रुग्णवाहिका घटनास्थळी नेऊन डोहात त्याचा मृतदेह शोधून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणला. शुक्रवारी दुपारी शवविच्छेदन आचोपल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांना सोपविण्यात आला.
शुभमच्या मृत्यूप्रकरणी भैसदेही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. उपविभाग असल्याने अचलपूर पोलीस ठाण्यानेही या प्रकरणाची नोंद घेतली आहे.
दरम्यान, पर्यटनाला जाताना हुल्लडबाजीमुळे पर्यटकांना वा वाहनाला अपघात व त्यातून जीव गमवावा लागत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

सैन्यात झाली निवड
मृत शुभम गजबेची निवड सैन्यात झाली होती. वैद्यकीय तपासणी तेवढी बाकी असल्याची माहिती आहे.

Web Title: Young man dies in drowning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू