शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

आंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 18:28 IST

रंगपंचमीची रंग खेळून आष्टा परिसरातील वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या सहा युवकांपैकी एका 18 वर्षीय आदिवासी युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रंगपंचमीच्या दिवशी दुपारी एक वाजता घडली.  

मोहन राऊत

रंगपंचमीची रंग खेळून आष्टा परिसरातील वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या सहा युवकांपैकी एका 18 वर्षीय आदिवासी युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रंगपंचमीच्या दिवशी दुपारी एक वाजता घडली.  

विशाल गणेश उईके असे मृतक युवकाचे नाव असून नदीत पोहण्यात वाचलेल्या युवकांचे नाव राहुल गजानन चव्हाण वय (25) ,ऋषिकेश अशोक मोहिजे (20), गुड्डू गजानन गेडाम (22), सुरज दिवाकर पंधरे (24), आकाश रामदास पवार (26) अशी या घटनेतून सुखरूप वाचलेल्या युवकांची नावं आहेत.

तालुक्यातील निंबोली भोंगे येथील हे सहा युवक रंगपंचमी खेळून दुपारी बारा वाजता आठ किलोमीटर अंतराववर असलेल्या नजीकच्या आष्टा गावाजवळ वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी गेले होते. सर्व सहा ही युवक या नदीत पोहण्यासाठी नदीत उतरले विशाल याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो काही अंतरावर पोहण्यासाठी गेला मात्र काही वेळाने त्याच्या किंकाळ्या ऐकू आल्या त्यामुळे नदीत असलेल्या पाच युवकाने आरडा ओरड सुरू केली बाजूच्या परिसरात असलेल्या ग्रामस्थांनी या युवकांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला परंतु तोपर्यंत विशाल याचा मृत्यू झाला होता. वाहत्या पाण्यात त्याचा मृतदेह वाहून गेला या घटनेची माहिती मंगरूळ दस्तगीर येथील पोलिसांना मिळताच त्यांनी घटना स्थळावर धाव घेतली. त्यानंतर मृत युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. 

आई मी आंघोळ करून परत येतो

वडीलांचा सात वर्षापूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर विशाल याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती एक बहीण लग्नाची आहे आई मी आंघोळ करून आष्टा येथून परत येतो असे आपल्या आईला सांगून विशाल हा वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी गेला होता त्याच्या मृत्यूची वार्ता समजताच वृद्ध आईने हंबरडा फोडला असल्याची माहिती पोलीस पाटील विवेक वैरागडे यानी दिली मंगरूळ दस्तगीर येथील ठाणेदार सतीश आडे  पोलीस उपनीक्षक  ठावरे  देवेन्द्र नस्करी निस्ताने या घटनेचे अधिक तपास करीत आहे

 

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र