रानडुक्करामुळे दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST2021-04-22T04:13:26+5:302021-04-22T04:13:26+5:30
अमरावती : भरधाव दुचाकीसमोर रानडुक्कर आडवे आल्याने दुचाकी रस्त्यावरून घसरली. यात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी ...

रानडुक्करामुळे दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू
अमरावती : भरधाव दुचाकीसमोर रानडुक्कर आडवे आल्याने दुचाकी रस्त्यावरून घसरली. यात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी अंजनगाव बारी ते पार्डी रोडवरील घडली.
चंद्रभान बारकुजी धनकाकडे (३७, रा. पार्डी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात बडनेरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला. लक्ष्मण श्रीराम मांडोगडे (३५ रा. ओमकार खेडा, नांदगाव खंडेश्वर) आणि चंद्रभान धनकाकडे असे दोघे एमएच २७ सीजे ३७३९ ने बडनेरावरून पार्डीकडे जात होते. दरम्यान अंजनगाव बारी ते पार्डी मार्गावरील तेलाई माता मंदिराजवळ अचानक त्यांच्या दुचाकीसमोर रानडुक्कर आले. त्यामुळे त्यांची दुचाकी अनियंत्रीत होऊन रस्त्यावर कोसळली. या अपघातात चंद्रभान व लक्ष्मण हे दोघेही गंभीर जखमी झाले. काही नागरिकांनी दोन्ही जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु उपचारादरम्यान चंद्रभानचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार लक्ष्मण मांडोगडे यांनी बडनेरा पोलिसात नोंदविली.