पत्नी, नातेवाक्षकांच्या जाचाला कंटाळूनच युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST2021-04-06T04:12:44+5:302021-04-06T04:12:44+5:30
अमरावती : पती व सासरच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. परंतु, पत्नी व तिच्या माहेरच्या ...

पत्नी, नातेवाक्षकांच्या जाचाला कंटाळूनच युवकाची आत्महत्या
अमरावती : पती व सासरच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. परंतु, पत्नी व तिच्या माहेरच्या मंडळीच्या त्रासामुळे पतीने आत्महत्या केल्याची घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील संकेत कॉलनीत रविवारी सायंकाळी उघडकीस आली आहे.
बृजेशप्रताप बहादुरसिंह चौहान (३४, रा. माधव अपार्टमेंट, संकेत कॉलनी) असे मृताचे नाव आहे. गाडगेनगर पोलिसांनी या युवकाने मृत्युपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीवरून पत्नीसह सासरच्या तिघांना अटक केली. ललित राम गावंडे (३१, रा. कॅम्प रोड), अश्विनी ललित गावंडे (३०) व रेखा ऊर्फ रूपाली बृजेशप्रताप चौहान (३५, रा. संकेत कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी पत्नीसह सहा जणांविरुद्ध भादंविच्या कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.
बॉक्स
कौटुंबिक वादामुळे पती त्रस्त
पोलीस सूत्रांनुसार, बृजेशप्रताप चौहान व पत्नी रेखा यांच्या कौटुंबिक कारणांवरून अनेकदा वाद होत होते. बृजेशप्रतापचे बेरोजगारी व आर्थिक अडचणीमुळे नेहमी सासरच्या मंडळीसोबत वाद व्हायचे. या कौटुंबिक कहलाचे प्रकरण महिला सेलकडे समुपदेशनाकरिता होते. यादरम्यान बृजेशप्रतापने रविवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचमामा केला. पोलिसांना घटनास्थळी बृजेशप्रतापने मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. यावरून पोलिसांनी पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली, तर अन्य तिघे पसार झाले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.