प्रेमप्रकरणातून युवकाला पैशासाठी शस्राचा धाक दाखवून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:14 IST2021-05-21T04:14:59+5:302021-05-21T04:14:59+5:30

पोलीसुत्रानुसार, एका २७ वर्षीय महिला (रा. गौतम नगर कारंजा लाड) अजय वानखडे (३५, रा. अकोला व त्याचे इतर ...

Young man beaten for fear of arms for money in a love affair | प्रेमप्रकरणातून युवकाला पैशासाठी शस्राचा धाक दाखवून मारहाण

प्रेमप्रकरणातून युवकाला पैशासाठी शस्राचा धाक दाखवून मारहाण

पोलीसुत्रानुसार, एका २७ वर्षीय महिला (रा. गौतम नगर कारंजा लाड) अजय वानखडे (३५, रा. अकोला व त्याचे इतर सोबती असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी फिर्यादी नवल पुरुषोत्तम राठी (२८, रा. सातुर्णा) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. फिर्यादी व महिला आरोपी यांच्यात पाच वर्षापासून लग्न न करण्याच्या शर्तीवर प्रेम संबध होते. मात्र काही वाद झाल्याने आरोपीने संगनमत करून फिर्यादीच्या घरी अनोळखी दोन मुलांना पाठढवून त्याला पीडीएमसी हॉस्पटिल समोर नेवून मारहाण केली. त्याच्या दुचाकी व मोबाईल हिसकला तसेच मुलीशी लग्न कर अशी धमकी दिली. तसेच गाडगेनगर ठाण्यासमोर नेवून धमकाविले. त्यानंतर दुचाकीवर बसवून वडाळी येथील एका घरात त्याला डांबले व मारपीठ करून शस्र्राचा धाक दाखवून प्रकरण निपटायचे असेल दोन लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर त्याला मारहाण करून मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसानी आरोपीविरुद्ध भादविची कलम ३४२,३६३,३८६,३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Young man beaten for fear of arms for money in a love affair