मद्यपीकडून तरुणास मारहाण, शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:29 IST2020-12-16T04:29:16+5:302020-12-16T04:29:16+5:30
---------------- म्हैस विक्रीस नकार; महिलेला मारहाण वरूड : घरची म्हैस विक्रीस नकार देणाऱ्या महिलेला काठीने मारहाण करण्यात आली. १३ ...

मद्यपीकडून तरुणास मारहाण, शिवीगाळ
----------------
म्हैस विक्रीस नकार; महिलेला मारहाण
वरूड : घरची म्हैस विक्रीस नकार देणाऱ्या महिलेला काठीने मारहाण करण्यात आली. १३ डिसेंबर रोजी दुपारी अमडापूर येथे ही घटना घडली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी आरोपी अनिल जगन शिंदे (२५, रा. अमडापूर)विरूद्ध गुन्हा दाखल केला.
----------------
विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग
राजुराबाजार : येथील ऑटो स्टॅन्डवर एका २४ वर्षीय विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आला. १३ डिसेंबर रोजी दुपारी हा प्रकार घडला. वरूड पोलिसांनी आरोपी महेश प्रल्हाद निंभोरकर (२२, ढगा) विरूद्ध गुन्हा नोंदविला.
------------
बनोशाच्या जयस्तंभ चौकातून दुचाकी लंपास
दर्यापूर : बनोसा येथील जयस्तंभ चौकातून एमएच २७ एम ३४४९ क्रमांकाची दुचाकी १० डिसेंबर रोजी लंपास करण्यात आली. येथील विनोद बैस हे दुचाकी भिंतीशेजारी ठेवून बाजारासाठी गेले असता, हा प्रकार घडला. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदविला.
---------------
‘त्या’ टिप्परचालकाविरूद्ध गुन्हा
दर्यापूर : अजितपूर ते बोराळादरम्यान उभ्या टिप्परवर धडकून दुचाकीस्वार विकी आठवले (रा. दारापूर) याचा मृत्यू झाला होता. अंकुश खडसे (रा. दारापूर) हा गंभीर जखमी झाला. १२ डिसेंबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी मृताचा भाऊ विजेंद्र आठवले यांच्या तक्रारीवरून आर.जे. २७ जे.सी. ६३२५ या टिप्परच्या चालकाविरूद्ध गुन्हा नोंदविला.
---------------
अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी
दर्यापूर : गौरखेडा ते खल्लार फाट्यादरम्यान झालेल्या दुचाकी अपघातात पंडित कडू (४०, गौरखेडा) नामक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. १२ डिसेंबर रोजी दुपारी हा अपघात घडला. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी एमएच ३० ए एल ५७८२ या दुचाकीच्या चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
----------------
गुरुकुल कॉलनीत चोरी
परतवाडा : येथील गुरुकुल कॉलनीतील रहिवासी गणेश ढाकुलकर यांच्या घरातून ४५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व २५०० रुपये रोख लंपास करण्यात आली. ९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरदरम्यान हा प्रकार घडला. ढाकुलकर दाम्पत्य पुण्याला गेले असता, शेजाऱ्यांनी त्यांना चोरीची माहिती दिली. परतवाडा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------
‘त्या’ अपघाताप्रकरणी मृताविरुद्ध गुन्हा
चिखलदरा : तालुक्यातील बेलकुंड नाल्याजवळ १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या अपघातप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी मृत शालिकराम श्यामराम धिकार (३०, रा. दुनी) विरुद्ध गुन्हा दाखल केला. एमएच २७ एएच ०७७९ या दुचाकीने जात असताना शालिकराम यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. तपासाअंती चिखलदरा पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी गुन्हा नोंदविला.
-----------
अवैध रेती वाहतूक; मालवाहू वाहन जप्त
आसेगाव पुर्णा : स्थानिक पोलिसांनी तळणीपुर्णा ते तामसवाडी मार्गावरून अवैध रेती वाहून नेणारे एमएच १९ एस ५१३४ क्रमांकाचे मालवाहू वाहन जप्त केले. त्यात ५ हजार रुपये किमतीची रेती होती. १२ डिसेंबर रोजी रात्री १० ते ११ च्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईप्रकरणी पोलिसांनी पसार चालक-मालकाविरूद्ध गुन्हा नोंदविला.
--------------
गरजूंना ब्लँकेट वाटप
चांदुर रेल्वे : श्री दत्त महिला बहुउद्देशीय ग्रामीण विकास महिला संस्था यवतमाळतर्फे गरजवंतांना १०० ब्लँकेट वितरण करण्यात आले. यात जितेंद्र गोरे, नीलेश बन्सोड, अनंत कडुकार, बिपीन देशमुख, राजेंद्र लांजेवार, राजू बेलसरे, शेखर पुतळे, सतीश वानखडे, संजय श्रीरामे, दिनू जडित यांचे योगदान लाभले.
--------------------------
मनसे तालुकाध्यक्षपदी रोशन लोखंडे
वरूड : तालुका मनसे अध्यक्षपदी रोशन लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांचे हस्ते रोशन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी तेजस पेठे, मोर्शीचे तालुकाध्यक्ष नितीन लुंगे, शुभम पोहरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तालुक्यात मनसेची ताकद वाढविण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली.
----------------------
फोटो पी १४ चांदूरबाजार
कर्तुत्ववान महिलांचा सत्कार
चांदुर बाजार : स्थानिक जिजामाता विद्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अभय देशमुख, भाई देशमुख, नगराध्यक्ष नितीन कोरडे, सुरेश विधाते, प्राचार्य प्रफुल्ल राऊत, रमेश देशमुख, हेमंत देशमुख, बाळासाहेब किटूकले, नंदकुमार बंड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब खडके, एजाज अली, आशा गोटे, गजानन तट्टे, सारिका बर्वे, आनंद एरोकार उपस्थित होते.
--------------------------