युवकावर कुऱ्हाड, चाकूने प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:14 IST2021-05-11T04:14:10+5:302021-05-11T04:14:10+5:30

अमरावती : रस्त्यावर उभे राहण्याच्या वादातून चिंचफैल येथे रविवारी रात्री एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा ...

Young man attacked with ax, knife | युवकावर कुऱ्हाड, चाकूने प्राणघातक हल्ला

युवकावर कुऱ्हाड, चाकूने प्राणघातक हल्ला

अमरावती : रस्त्यावर उभे राहण्याच्या वादातून चिंचफैल येथे रविवारी रात्री एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पोलीस सूत्रांनुसार, चिनी ऊर्फ संतोष सोमनाथ यादव (३०, रा. चिंचफैल) असे गंभीर जखमीचे नाव आहे. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी संदीप वावळे (४१), चेतन वावळे (२६) आणि राजेंद्र माने (४८, सर्व रा. चिचफैल) या तिघांना अटक केली. न्यायालयाने तिन्ही आरोपींना १३ मेपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली. रविवारी रात्री ११ च्या सुमारास चिनी ऊर्फ संतोष हा चिंचफैल परिसरातील रस्त्यावर उभा होता. रस्त्यावर का उभा आहे, असे आरोपींनी संतोषला म्हटल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. या वादानंतर आरोपींनी संतोषवर कुऱ्हाड व चाकूने प्राणघातक हल्ला चढविला. त्यामुळे संतोष हा गंभीर जखमी झाला. काही नागरिकांनी संतोषला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेची तक्रार फिर्यादी आरती राजेश यादव यांनी राजापेठ ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अटक तिघांसह एकूण सात जणांविरुद्ध भादंविचे कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Young man attacked with ax, knife