तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा...
By Admin | Updated: August 15, 2015 00:39 IST2015-08-15T00:39:59+5:302015-08-15T00:39:59+5:30
आज भारताचा ६८ वा स्वातंत्र्य दिन. या ६८ वर्षांच्या कालखंडात भारताने अनेक स्थित्यंतरे पाहिलीत. खडतर तपश्चर्येतून देशाने जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळविले आहे.

तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा...
आज भारताचा ६८ वा स्वातंत्र्य दिन. या ६८ वर्षांच्या कालखंडात भारताने अनेक स्थित्यंतरे पाहिलीत. खडतर तपश्चर्येतून देशाने जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळविले आहे. कडू-गोड अनुभवांच्या शिदोरीतून तरूणाईने देशाच्या विकासाची धुरा यशस्वीपणे पेलली आहे. यशाच्या नव्या शिखरावर प्रिय भारताला नेण्यास आता ही नवी पिढी आतूर झालीय. देशप्रेमाच्या भावनाने ओथंबलेल्या या पिढीच्या हाती तिरंगा सुरक्षित आहे, याची म्हणूनच खात्री पटते. शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील या चिमुकल्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या तिरंग्यासह असा जल्लोष केला.